Nashik

कळवण नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल

कळवण नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल

कळवण प्रतिनिधी । सुशिल कुवर :
कळवण नगर पंचायत नगराध्यक्षपदासाठी गटनेते कौतिक पगार यांनी विहित विहित मुदतीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारला तर पीठासीन अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी छाननी नंतर सदर अर्ज वैध ठरविला आहे.

कळवण नगर पंचायत नगराध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी सुटल्याने नगर पंचायतीचे सर्वेसर्वा कौतिक पगार यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. कळवण नगर पंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 9, शिवसेना 2, काँग्रेस 3, मनसे 2, भाजपा 2 असे पक्षीय बलाबल आहे. या नगर पंचायत मध्ये आमदार नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने 17 पैकी 14 जागा जिंकल्याने नगराध्यक्ष महाविकास आघाडीचाच होणार आहे निश्चित झाले होते.

काल दि 8 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदासाठी सकाळी विहित मुदतीत कौतिक पगार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारला तर पीठासीन अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी छाननी नंतर सदर अर्ज वैध ठरविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाची दि 15 फेब्रुवारी औपचारिक निवड राहिली आहे. त्याच दिवशी उपनगराध्यक्षपदाची निवड होणार आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

यावेळी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, कळवण एज्युकेशन समितीचे संचालक भूषण पगार, नगर सेवक सुनीता पगार, रत्ना पगार, हर्षाली पगार, ताराबाई आंबेकर, रोहिणी महाले, लता निकम, जोत्सना जाधव, बाळू जाधव, राहुल पगार, तेजस पगार, गौरव पगार, मोतीराम पवार, मनसे नगरसेवक चेतन मैंद, रोहित पगार, अतुल पगार राजेंद्र भामरे, जितेंद्र पगार, जयेश पगार, हरिश्चंद्र पगार, नितीन पगार, प्रशांत पगार, छत्रसाल पगार, मोयोद्दीन शेख आदींसह महाविकास आघाडी समर्थक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button