Bollywood

Bollywood: तुम्ही तुमच्या जबाबदारीने ट्रेलर पहा…! ह्या वेब सिरीज संदर्भात दिग्दर्शकाने दिला इशारा..

Bollywood: तुम्ही तुमच्या जबाबदारीने ट्रेलर पहा…! ह्या वेब सिरीज संदर्भात दिग्दर्शकाने दिला इशारा..

आपल्या कलाकृतीला प्रेक्षकांसमोर आणून त्याविषयीचे प्रमोशन करण्याचा दिग्दर्शकाचा नेहमीच प्रयत्न असतो. जेणेकरुन प्रेक्षकांनी ट्रेलर, टीझरमधून त्या कलाकृतीविषयी जाणून घेत ती कलाकृती प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा आनंद घ्यावा, हा त्यामागील प्राथमिक उद्देश असतो. सास बहू और फ्लेमिंगोची गोष्ट जरा वेगळी आहे.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया या नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहिल्या आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही डिंपल कपाडिया यांच्या नावाची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. सास बहू और फ्लेमिंगोमध्ये त्यांची भूमिका ही कमालीची रंगतदार झाल्याचे दिसून आले आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर व्हायरल झाला असून दिग्दर्शकानं तो ट्रेलर पाहताना ज्यानं त्यानं आपल्या जबाबदारीवर तो पाहावा असे म्हटले आहे.

दिग्दर्शकानं असे सांगितल्यामुळे नेटकऱ्यांची उत्सुकता आणखी वाढल्याचे दिसून आले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. क्योंकी सास भी कभी बहू थी गाण्यानं ट्रेलरला सुरुवात होते.त्यानंतर होणारा गोळीबार, क्रौर्य, रक्तपात हे सगळं काही सुन्न करणारं आहे. त्यामुळेच की काय दिग्दर्शकानं सुरुवातीलाच नाजूक काळजाच्या प्रेक्षकांनी या ट्रेलरच्या वाट्याला जाऊ नये. असे का सांगितले हे कळते. सास बहू और फ्लेमिंगो ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
डिंपल कपाडिया या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ओटीटीवर येणार आहेत. सास बहू और फ्लेमिंगोचे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले असून त्याचा ट्रेलर डिझ्नी हॉट स्टारवर प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी होमी अदजानिया यांनी बीईंग सायरस, कॉकटेल सारखे चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत असणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button