Pandharpur

Pandhrpur: समाजात चांगले कार्य करणाऱ्या घटकांना पत्रकारांनी प्रसिद्धी द्यावी. आ. प्रशांत परिचारक.

समाजात चांगले कार्य करणाऱ्या घटकांना पत्रकारांनी प्रसिद्धी द्यावी. आ. प्रशांत परिचारक. प्रतिनिधी
रफिक आतारपंढरपूर दर्पणकार पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वृत्तपत्र काढण्याचा उद्देश राज्याने चांगला जोपासला आहे,समाजात अनेक घटक खूप चांगले काम करीत आहेत. पण अशा घटकांना फार कमी प्रसिद्धी दिली जाते, पत्रकार बांधवांनी चांगले काम करणाऱ्या घटकांना प्रसिद्धी द्यावी असे प्रतिपादन आमदार श्री प्रशांत परिचारक यांनी केले, पंढरपूर येथील योग भवन येथे गुरुवार दि६जानेवारी पत्रकार दिनानिमित्त राज्य पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार ह भ प बाळासाहेब बडवे,प्रमुख पाहुणे तहसीलदार सुशील बेल्हेकर,राज्य पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रामचंद्र सरवदे, तालुकाध्यक्ष प्रशांत माळवदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाङ, पत्रकार सुरक्षा समितीचे शहराध्यक्ष दत्ताजी पाटील, माहिती सहाय्यक अधिकारी अविनाश गरगडे,पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.ते पुढे बोलताना म्हणाले,सध्या सर्व प्रकारच्या मीडियात वाईट घटना आणि नकारात्मक बातम्या दिल्या जातात, तर हे टाळावे विधिमंडळात अनेक वर्षांपासून तेच प्रश्न विचारले जातात, केवळ ते विचारणारे मंडळी बदललेले असतात. कारण आपल्या देशात लोकशाही आपण स्वीकारली आहे. पूर्वी ठराविक वृत्तपत्र वाचणारे लोक होते,तर काही पेपरमधील अग्रलेख आवर्जून वाचले जात असत आजच्या काळात हे दिसत नाही.आज अनेक वृत्तपत्र ठोस भूमिका मांडताना आग्रही दिसत नाहीत .पूर्वी मोजकीच वर्तमानपत्र होती पण ती वाचणारा वर्ग मोठा होता. आज काळ बदलला आहे, सोशल मीडियावर दुसऱ्या मिनिटाला कुठे काय घडले याची माहिती होत आहे, यु ट्यूब चॅनेल,वेब पोर्टल,ब्लॉगर, ट्विटर इन्स्टाग्रामवर लगेच बातम्या, व्हिडीओ येत आहेत. तंत्रज्ञान विकसित झाले पण सकारात्मक बातम्या, संदेश अशा बातम्या जास्त प्रमाणात आल्या पाहिजेत असे आमदार परिचारक म्हणाले,कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार ह भ प श्री बाळासाहेब बडवे म्हणाले,पत्रकारिता हे सृजनतेच दुसरं नाव आहे. पत्रकारांनी नकारात्मक वृत्ती आणि कुकर्म करणाऱ्या लोकांना ठेचून काढले पाहिजे,पंढरपूर येथील पत्रकारात एक टॅलेंट आहे,त्यामुळे इथल्या पत्रकारांचा राज्यात दबदबा निर्माण झाला आहे, रामभाऊ सरवदे यांच्यासारखा सर्वसामान्य माणूस आज राज्यातील पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत .केवळ हौस म्हणून किंवा पैसे कमावण्यासाठी पत्रकारिता करू नका. जगात परमेश्वरा शिवाय कुणालाही भिऊ नका .अंतःकरण स्वच्छ आणि हात साफ असतील तरच तुम्हाला पत्रकारिता करण्याचा अधिकार आहे. यानंतर सुशील बेल्हेकर,बालाजी पूदलवाङ ,रामभाऊ सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवर सर्व पदाधिकारी, पत्रकार यांचा पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल, उपाध्यक्ष विजयकुमार कांबळे,प्रसिद्धीप्रमुख चैतन्य उत्पात, सहसचिव रफिक आतार , सचिव विश्वास पाटील ,संघटक विनोद पोतदार,खजिनदार बाहुबली जैन,सहखजिनदार राजाभाऊ काळे,संघटक सौ सुनीता भालेराव,नागटिळक,शहर संपर्कप्रमुख कबीर देवकुळे, रामकृष्ण बिडकर,सचिन कुलकर्णी, आशपाक तांबोळी, ,संजय यादव, विठ्ठल जाधव,विकास सरवळे, नेताजी वाघमारे, चंद्रकांत माने, मोटे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.प्रास्ताविक रामभाऊ सरवदे यांनी केले, सूत्रसंचालन रवींद्र शेवडे यांनी केले. विजय कांबळे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button