Nashik

दिंडोरी तहसील कार्यालयाच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार

दिंडोरी तहसील कार्यालयाच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यातील मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र पत्रकार संघ व विश्व गामी पत्रकार संघ अध्यक्ष व सर्व सदस्य यांचा सत्कार दिंडोरीचे तहसील कार्यालयाच्या वतीने नाशिक जिल्ह्यात दिंडोरीची परंपरा जोपासत असताना दिंडोरी चे तहसीलदार माननीय पंकज पवार तसेच त्यांचे सर्व अधिकारी नायब तहसीलदार यांच्यावतीने करण्यात आला दर वर्षी सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन होत असते परंतु दिंडोरीत असलेल्या नगरपंचायत निवडणुका व काही कारणास्तव हा कार्यक्रम लेट परंतु चांगल्या प्रकारे आयोजन करून दिंडोरी येथील मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवानराव गायकवाड मावळते अध्यक्ष संतोष जी कथार बापू चव्हाण संदीप गुंजाळ धनंजय वानले पत्रकार नगरसेवक नितीन गांगुर्डे संदीप मोगल सुनील घुमरे समाधान पाटील किशोर जाधव अशोक निकम अमोल जाधव नारायण राजगुरू अनिल गांगुर्डे महेंद्र पैठणे दिगंबर पाटोळे आदींसह तालुक्यातील सर्व पत्रकार या कार्यक्रमासाठी हजर होते यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने सर्व पत्रकारांना शिर्डी संस्थान साई बाबा दरबार डायरी पेन पुष्पगुच्छ तसेच अल्पोहार देऊन सन्मानित करण्यात आले व दिंडोरी तालुक्यात प्रशासन आणि पत्रकार लोकप्रतिनिधी यांच्या मध्ये असलेला सुसंवाद नक्कीच दिंडोरी तालुक्यात चांगल्याप्रकारे असून प्रशासनाची चूक असल्यास किंवा नागरिकांची चूक असल्यास किंवा लोकप्रतिनिधींकडून वेळेवर आवश्यक त्या बाबींच्या संदर्भात लेखणीतून किंवा समन्वयाने योग्य त्या गोष्टी निदर्शनास आणून देण्याचे काम सर्व पत्रकार करीत असून अतिशय चांगल्या प्रकारचे काम या तालुक्यात पत्रकारांचे माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार पंकज पवार यांनी व्यक्त केले यावेळी पत्रकारांच्या वतीने संतोष कथार धनंजय वानले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार व सूत्रसंचालन तुषार वाघ यांनी केले कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ गटविकास अधिकारी चंद्रकांत बाविस्कर नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर नायब तहसीलदार तांबे साहेब यांचेसह भूमी अभिलेख अधिकारी व तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button