Nashik

Nashik: थोरात विद्यालयात पत्रकार दिनानिम्मित पत्रकारांचा सत्कार

थोरात विद्यालयात पत्रकार दिनानिम्मित पत्रकारांचा सत्कार

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

मोहाडी दिनांक ६ जानेवारी

मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर कॉलेज मोहाडी विद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीराम खुर्दळ होते. अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते यावेळी पत्रकार सुनिल घुमरे, नंदकुमार डिंगोरे, किशोर जाधव,संतोष निकम यांचा सत्कार करण्यात आला.प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व विशद केले. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणुन आज पत्रकारीतेकडे पाहिले जाते. वर्तमानपत्राच्या माध्यमातुन आपल्याला देशविदेशातील माहिती उपलब्ध होत असते.स्वातंत्र्यपूर्व काळापासुन वर्तमानपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामनाथ गडाख व आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका प्रमिला देशमुख यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button