Rawer

पत्रकार हा सर्वांचा मित्र -जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे

पत्रकार हा सर्वांचा मित्र -जेष्ठ पत्रकार राजीव बोरसे

निंभोरा बु।।ता रावेर संदिप कोळी
पत्रकार हा सर्वांचा मित्र असून तो कधीच कोणाचा शत्रु नसतो .पत्रकार ,लोकप्रतिनिधि ,पोलिस ,जनता यांचा नेहमी सुसंवाद असल्यास सहज प्रश्न सुटून नेहमी शांतता ,जातीय सलोखा राहून न्याय मिळण्यास मदत होऊ शकते असे प्रतिपादन निंभोरा पोलिस ठाण्यात पत्रकार दिननिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन जेष्ठ पत्रकार श्री. राजीव बोरसे यांनी व्यक्त केले ..यावेळी पत्रकार दिननिमित्त सर्व पत्रकारांचा सत्कार सपोनि स्वप्निल उनवणे यांनी शाल श्रीफळ देऊन गौरव केला . याप्रसंगी सपोनि स्वप्निल उनवणे, पत्रकार राजीव बोरसे, गुणवंत पाटिल ,प्रदीप पंजाबी, विनायक जहूरे ,भीमराव कोचुरे, शेख इद्रीस, कांतिलाल गाढ़े, सागर तायड़े, आशिष बोरसे, पुरषोत्तम संघपाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार दस्तगीर खाटीक,प्रभाकर महाजन, राहुल जैन, रितेश चौधरी, सादिक पिंजारी ,आशिष चौधरी, तसेच पो. का.भूषण सुशिर, पो हे का. विकास कोल्हे, पो हे का .बापू पाटिल, पो हे का .ज्ञानेश्वर चौधरी, पो हे का .ज्ञानेश्वर पाटिल, पो का. अजय महाजन, पो का. किरण जाधव, पो का. पूजा वंजारी, पो हे का.शेख अशरफ, पो का. योगेश पाटिल, होमगार्ड अकील शेख यासह आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल पाटिल यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button