sawada

त्या अवैध वृक्षतोड बाबतची चौकशी गुलदस्त्यात का?

त्या अवैध वृक्षतोड बाबतची चौकशी गुलदस्त्यात का?

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या मालकीचे जवळपास २० लाखांपेक्षा अधिक किंमतचे जिवंत डेरेदार वृक्षांची दिवसाढवळ्या राजेरोसपणे ऑक्टोबर २०२२ मध्ये सावदा ते सावखेडा दरम्यान उच्च दाबाच्या वीज वाहीण्या व वीज पोल टाकण्याकरिता कायद्याने विहित केलेल्या पद्धतीचा वापर न करता अवैधरित्या करण्यात आलेली वृक्षतोड बाबत सदरील सा.बां.उपविभाग,विज वितरण विभाग सावदा व वन क्षेत्रपाल कार्यालय रावेर सह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका वृक्ष प्रेमीने वेळप्रसंगी पुराव्यानिशी तक्रार दाखल केली असून अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या देखील प्रस्धिद झालेल्या असतांना सुद्धा संबंधितांकडून चौकशी न करणे हे संशयास्पद दिसत असून तरी या मागील कारण काय?तरी या प्रकरणाची सत्यता उघडकीस होवून दोषींवर कायदेशीर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद व्हावा.म्हणून याबाबतची लेखी तक्रार शेख फरीद शेख नुरोद्दीन व दिलीप रामभाऊ चांदेलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देवून झालेली सदरील अवैध वृक्षतोड मुळे शासनाचा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान ज्या संबंधित अधिकारीच्या पाठ बळावरून वृक्षतोड करणारे व्यक्तीने हे गैरप्रकार स्व:ताचे आर्थिक हित जपण्यासाठी असेल यांच्या विरोधात तात्काळ सखोलपणे चौकशी होऊन दोषींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून असे न झाल्यास या प्रकरणी स्व:ता तक्रारदारांच्या वतीने सनदशीर मार्गाने योग्य त्या शासनाचे विभागा सह न्यायालयात दावा दाखल केला जाईल असे ही तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button