Maharashtra

महिला बाल विकास विभागात 138 जागांसाठी नोकरीची संधी..आजच करा अर्ज..ही आहे अंतिम तारीख आणि ऑनलाइन लिंक..

महिला बाल विकास विभागात 138 जागांसाठी नोकरीची संधी.. आजच करा अर्ज..ही आहे अंतिम तारीख आणि ऑनलाइन लिंक..

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र इथे तब्बल 138 जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अध्यक्ष आणि सदस्य या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अध्यक्ष, आणि सदस्य- सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानन आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बाल विकासबंधित आरोग्य, शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षाचा सक्रीय सहभाग आणि अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक या विषयातील व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असावा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर नोटिफिकेशनमध्ये आपल्या जिल्ह्यतातील महिला आणि बाल विकास कार्यलयात ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत.

निवड प्रक्रिया
या पदभरतीसाठी उमेदवार हे मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहेत. म्हणूच उमेदवारांनी दिलेल्या तिथीवर मुलाखतीसाठी उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑक्टोबर 2021

शैक्षणिक पात्रता
बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र पदवीधर

अर्ज पाठवण्याचा पत्ता
जिल्ह्यतातील महिला आणि बाल विकास कार्यलय

निवड प्रक्रिया
उमेदवार हे मुलाखतीद्वारे निवडण्यात येणार आहेत

शेवटची तारीख
02 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी

https://www.maharashtra.gov.in/1125/Home या लिंकवर क्लिक करा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button