Rawer

मोठे वाघोदा येथे जीवा महाले यांची जयंती साजरी जीवासेना वाघोदा शाखेचे उद्घाटन

मोठे वाघोदा येथे जीवा महाले यांची जयंती साजरी
जीवासेना वाघोदा शाखेचे उद्घाटन

मुबारक तडवी रावेर

रावेर : प्रतापगडाच्या रणसंग्रामात जीवाची बाजी लावणारे शूर शिलेदार जीवा महाले यांच्या जयंतीनिमित्त मोठे वाघोदे येथे ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहात अखिल भारतीय जीवा सेना शाखा वाघोदा यांच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शूर शिलेदार जिवा महाले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच मुबारक(राजू ) तडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन स्वप्निल पवार यांनी केले त्यावेळी जीवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सेठी,ता.अध्यक्ष जीवन बोरणारे,ता. उपाध्यक्ष योगेश बोरणारे, ता.संपर्क प्रमुख सुरेंद्र न्हावी, कर्मचारी संघटना अध्यक्ष धनराज बोरणारे,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, ग्रा.पं. सदस्य, संजय माळी.राहुल पाटील.व सामाजिक कार्यकर्ते व सर्व समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button