Amalner

दागिने व मोबाईल चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात..!

दागिने व मोबाईल चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात..!

अमळनेर निलेश रघुनाथ महाजन रा. जापानजिन समोर अमळनेर हे त्यांच्या कडील टाटा एस कंपनीची मालवाहू गाडी क्र. एम.एच.१८ एए४०१९ सह कुरकुरे विक्री करण्याकरीता माल भरून खेडेपाड्यावर जावुन कुरकुरे विक्री करून दुपार ०४.३० वा.च्या सुमारास अमळनेर येथे जापानजीन जवळ येवुन लघवी करण्यासाठी गाडीचे खाली उतरले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाडीत ठेवलेली १३,०००/रू.रोख रकमेची बॅग चोरून नेली होती त्यावरून त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला अनोळखी चोरट्याविरूद्ध फिर्याद दिल्यावरून भाग ५ गुरन ४०४/२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि.२८/०९/२०२१ रोजी दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ सुनिल हटकर हे करीत होते.
पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना बातमी मिळाली की, इसम नामे दिपक पांडुरंग भोई रा. तांबेपुरा अमळनेर याचेजवळ काही महाग मोबाईल आहेत तसेच तो तीन चार दिवसापासुन पैसे खर्च करत आहे. त्यावरून मिळालेल्या बातमीची खात्री करणेकामी पोहेकॉ सुनिल हाटकर, पोना दिपक माळी, पोकॉ रविंद्र पाटील अशांनी त्याला ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले व विश्वासात घेवुन विचारपुस केली
असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली देवुन त्या दि.२३/०९/२०२१ रोजी सुमारे १,२५,०००/रू.किंमतीचे दागीने तहसिल कार्यालय येथील गेट समोर उभे असलेलल्या कार मधुन एका पर्स उचलुन चोरी केली तसेच दि. २३/०७/२०२१ रोजी बळीराजा चौकातील नर्सरीजवळ उभ्या असलेल्या गाडीतुन एक मोबाईल
व गंगाघाट येथील बाजारातुन वेगवेगळ्या वेळेस एकुण ०७ मोबाईल चोरी केले आहेत बाबत कबुली दिली.सदर आरोपी यास दि. २८/०९/२०२१ रोजी गुरन ४०५/२०२१ भादवि कलम ३७९ या गुनह्यात अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता त्यास दि. १०/१०/२०२१ पोवेतो पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली होती. त्यादरम्यान अमळनेर पोलीसांनी खालीलप्रमाणे गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१) ५०००/- रू. रोख
२) ३०,०००/- रू.किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट
३) ६३,०००/- रू. किंमतीची २१ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड
४) १८००/- रू.किंमतीचे ऐवज त्यात ०२ भार वजनाची चांदिचे बेले,०३ भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेट
५).००.००/- रू. किंमतीचे चॉकलेटी रंगाची लेडिज पर्स
६) ४४,०००/- रू.किंमतीचे विविध कंपनीचे सात अॅन्ड्रोईड मोबाईल हॅन्डसेट
एकुण १,४३,८०० रु.किंमतीचा ऐवज
वरील प्रमाणे मुद्देमाल नमुद आरोपीकडून जप्त करण्यात आला असुन सदर कारवाई
मा.पोलीस अधीक्षक श्री.डॉ.प्रविण मुंढे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.रमेश चोपडे व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राकेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे, व पोहेकॉ सुनिल हटकर, पोहेकॉ किशोर पाटील, पोना दिपक माळी,पोना शरद पाटील,पोना/हितेष चिंचोरे पोकॉ रविंद्र पाटील या पथकाने केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button