Jamner

जामनेरच्या चालकाची बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्या..

जामनेरच्या चालकाची बेरोजगारीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्या..

प्रतिनिधी : रजनीकांत पाटील


जामनेर : लॉकडाऊनपासून बेरोजगार झालेल्या जामनेरातील संतोष विश्वनाथ पवार (वय ४३) यांनी सोमवारी पहाटे खादगाव रोडवरील झाडाला गळफास घेतला.

एका खासगी वाहनावर चालक असलेल्या संतोष पवार यांना लॉकडाऊनच्या काळात घरी बसावे लागले. काही दिवस रिक्षा चालवून त्यांनी उदरनिर्वाहाचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने त्यांना नैराश्य आले. परिवाराची होणारी दैना पाहू न शकल्याने ते रविवारी घरून निघून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीय व नातेवाइकांना त्यांना घरी आणले. तरीही सोमवारी खादगाव रोडवरील एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सुभाष पवार यांना संतोष यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत दिसला. याप्रकरणी जामनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

पर्याय नसल्याने आत्महत्या
पवार हे खासगी वाहनावर चालक होते. कोरोना लॉकडाउनमध्ये हे काम सुटले. इतर पर्याय नसल्याने त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने जुनी रिक्षा घेतली. पण, खर्चदेखील निघत नव्हता. त्यामुळे पवार हतबल झाले होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button