Ambad

जालना – परभणी – नांदेड या नियोजित समृध्दी महामार्गास मराठवाडयाचे भाग्यविधाते ” कै.शकंररावजी चव्हाण ” यांचे नाव द्यावे.. भिमराव डोंगरे यांनी शिष्टमंडळासह केली मागणी…

जालना – परभणी – नांदेड या नियोजित समृध्दी महामार्गास मराठवाडयाचे भाग्यविधाते ” कै.शकंररावजी चव्हाण ” यांचे नाव द्यावे.. भिमराव डोंगरे यांनी शिष्टमंडळासह केली मागणी…

संजय कोल्हे जालना

अंबड : जालना -परभणी- नांदेड हा नविन समृध्दी महामार्ग महाराष्ट्र शासनाने हाती घेण्याचे ठरवले आहे.या नविन समृध्दी महामार्गामुळे मराठवाडयातील दळण – वळण अधिक सुकर होऊन गतिमान विकासासाठी भरीव चालना मिळणार आहे. या निमीत्ताने मराठवाड्याचे धुरंधुर नेते स्वातंत्र सेनानी तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री कै .शंकरावजी चव्हाण साहेब यांचे यथोचित स्मरण स्मारक करण्याची संधी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला चालून आली आहे. दगडधोंडयाच्या माळरान युक्त मागास मराठवाडयात जेव्हा कोणतीही सिंचन सुविधा नव्हत्या आणि सतत दुष्काळी परिस्थितीचे अरिष्ट घोंगावत होते.तेव्हा सर्व सामान्य जनतेची पाण्याची अडचण लक्षात घेऊन कै.शंकररावजी चव्हाण साहेब यांनी आपले नेतृत्व व कृतत्व पनास लावले आणि अतिशय दुरदृष्टीने मराठवाडयास वरदान ठरलेल्या जायकवाडी धरण प्रकल्प हाती घेऊन तो पुर्णत्वास नेला.आशिया खंडातील एकमेवाव्दितीय ठरलेल्या या लक्ष्यवेदी प्रकल्पामुळे मराठवाडयाची तहान तर भागलीच शिवाय अहमदनगर , औरंगाबाद , जालना , बीड , परभणी आणि नांदेड जिल्हयातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली व सर्व शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली हे कोणीही नाकारु शकत नाही.कै.शंकरावजी चव्हाण यांचे देश व महाराष्ट्र राज्यातील कुशल नेतृत्व व त्यांची विकासभीमुख कार्यशैली व त्यांचे मोठे कार्य लक्ष्यात घेता महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या जालना – परभणी- नांदेड या नियोजित समृध्दी महामार्गास मराठवाडयाचे भाग्यविधाते ” कै.शकंररावजी चव्हाण ” यांचे नाव देण्यात यावे , ही मराठवाडयातील तमाम नागरीकांची इच्छा आहे.तरी सदरील महामार्गास ” कै.शंकररावजी चव्हाण ” यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी राज्याचे नगर विकास ,सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंञी ना.एकनाथजी शिंदे यांना मंगळवार (दि-१) रोजी मुंबई येथे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रसंगी आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भिमराव पाटील डोंगरे,अंबड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत राणा,अंबड शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष संभाजी गुडे,तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे अध्यक्ष श्री. नारायण मुंडे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Back to top button