Jalgaon

Jalgoan: सावधान…जिल्ह्यात आज 88 रुग्ण कोरोना बाधित..! चोपडा 27 तर अमळनेर शून्य..!

Jalgoan: सावधान…जिल्ह्यात आज 88 रुग्ण कोरोना बाधित..! चोपडा 27 तर अमळनेर शून्य..!

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढले आहे. आज जिल्ह्यात तब्बल ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. दिलासादायक बाब अशी की आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आज दिवसभरात एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ४० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजच्या अहवालात जळगाव शहरासह चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अहवालात दिसून आले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर -३१, भुसावळ तालुका-२४, चोपडा-२७, यावल-२, रावेर-१, चाळीसगाव -३ असे एकुण ८८ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात २२३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button