Jalgaon

Jalgaon: दोन्ही चिमुकल्याना वडा पाव खाऊ घातला आणि धावत्या रेल्वेतून चिमुकल्यांसह घेतली उडी…!

Jalgaon: दोन्ही चिमुकल्याना वडा पाव खाऊ घातला आणि धावत्या रेल्वेतून चिमुकल्यांसह घेतली उडी…!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका 27 वर्षीय तरूणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या आणि चार वर्षांच्या मुलीसह या तरुणाने जीवन यात्रा संपवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील नगरदेवळा रेल्वेस्थानकावर ही घटना घडली. जितेंद्र दिलीप जाधव असं या बापाचे नाव आहे. चिराग नावाचा ६ वर्षाचा मुलगा व खुशी नावाची ४ वर्षाची मुलगी असे तिघे मयतांची नावे आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पूजा आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. चाळीसगाव येथील जे.जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणून काम करत होता. जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पूजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. जितेंद्र व पूजा यांच्यात भांडणं होत होती. त्यामुळे पूजाने तिचा भाऊ भुषण, काका सुधाकर व काकु यांना चाळीसगाव येथे बोलावून घेतले आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्रविरोधात विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button