Pandharpur

संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश शिवसेनेचे आ शहाजीबापू पाटील यांचा पाठिंबा

संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश शिवसेनेचे आ शहाजीबापू पाटील यांचा पाठिंबा
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : सागोला उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यातला पळविलेल्या पाण्याच्या निषेधार्थ कुंभकर्णा ची झोप घेतलेल्या आमदारांना जागे करावे म्हणून आज शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन हलगी नाद आले यावेळी दीपक भोसले माऊली हळणवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना माऊली हळणवर यांनी पालकमंत्री भरणे व अर्थमंत्री अजित दादा पवार यांचा तीव्र शब्दात निषेध केला व सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी एक ढेंब जाऊ देणार नाही प्रसंगी रक्त साडुं जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारात आंदोलन करण्यात येत आहे याचा बोध घेवुन या लढाई सहभागी व्हावे अन्यथा जनता रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा दिला
यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला व पुढील रक्तरंजित संघर्ष साठी संघर्ष समितीच्या सोबत तयार आहे जेव्हा जेव्हा शरद पवारांची सत्ता येथे तेव्हा उजनी धरणातील पाणी चोरण्याचे काम बारामतीकर करीत असतात जर धरण वळवायच यंत्र असतं तर पवारांनी संपूर्ण उजनी धरण बारामती कडे वळवले असतं असे सांगितले यावेळी समितीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मेटकरी धनाजी गडदे रुक्मिणी ताई दोलतडे आप्पासाहेब मेटकरी राहुल शिंदे लक्ष्मण चव्हाण यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button