Jalgaon

Jalgaon: धक्कादायक…अल्पवयीन मुलीचे लावले लग्न आता आहे गर्भवती..!

Jalgaon: धक्कादायक…अल्पवयीन मुलीचे लावले लग्न आता आहे गर्भवती..!

जळगाव शहरातील जुन्‍या जळगाव परिसरातील अल्पवयीन मुलगी असल्याची जाणीव असतांना तिचे लग्न लावून देण्यात आले. अल्‍पवयीन असल्‍याने मुलीची मानसिक व शारिरीक तयारी नसतांना पतीकडून शरीरसंबंध राहिल्याने ती गर्भवती राहिल्याने प्रकरणाचा उलगडा होवुन शनिपेठ पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नेांद करण्यात आली आहे.

शालेय शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शहरातील जुने जळगाव परिसरातील विठ्ठलपेठ भागात वास्तव्यास आहे. शिक्षण घेण्याच्या वयातच आई व मामाने तिचा विवाही जुळवून आणला. मुलीच्या शरीराची योग्यती वाढ झाली नसतांना ६ जुन २०२१ रेाजी तिचा जामनेर तालूक्यातील साहिल बशीर तडवी या तरुणाशी विवाह लावून देण्यात आला. मुलगी अल्पवयीन असतांना कुटूंबीयांनी शाळा सोडवुन तिचा बळजबरीने विवाह लावुन दिला.

तसेच मुलाला व त्याच्या कुटूंबीयांनाही ती अल्पवयीन असल्याची जाणीव असतांना कुठलाही विरोध न होता लग्न होवुन पिडीतेची बिदाई झाली. पतीने वारंवार शरीरसंबध ठेवल्याने पिडीता गर्भवती राहिली. पिडीतेला उपचारार्थ घेवुन गेल्यावर डॉक्टरांच्या लक्षात हि बाब आल्याने प्रकरण उघडकीस आले. बाल कल्याण समिती समक्ष मुलीचे जाब-जबाब नोंदवण्यात आले. पिडीतेच्या तक्रारीवरुन शनिपेठ पेालिस ठाण्यात पती सहील तडवी, पीडीतेची आई, पडितेचा मामा, सासू जमिला बाशीर तडवी, सासरे बाशीर तडवी, चुलत मावशी आरीफा तडवी, मुलाचा मामा यांच्यावर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button