Nashik

जळगाव आरपीआय जिल्हाध्यक्ष सह चौघांचा हत्या करणारा फरारी नाशिकरोड ला जेरबंद,

जळगाव आरपीआय जिल्हाध्यक्ष सह चौघांचा हत्या करणारा फरारी नाशिकरोड ला जेरबंद,

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक- जळगाव आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भुसावळ नगर परिषद भाजपचे नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात यांच्या सह कुटुंबातील पाच जणांवर गोळीबार करून खून व तीन जणांना गंभीर जखमी करून तीन वर्षापासून पसार असलेल्या गुन्हेगारास नाशिक रोड पोलिसांना यश आले असून अटक करण्यात आली आहे.नाशिकरोड येथे कारागृहातील गुन्हेगारांना भेटण्यासाठी येणार असल्याचे गुप्त माहिती जळगाव येथुन नुकतीच बदलून आलेले पोलिस कर्मचारी मनोहर शिंदे यांना फरारी अरबाज अजगर खान नाशिक रोड येथे कारागृह परीसरात आला आहे अशी माहिती मिळाली तर वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे जळगाव येथे कर्तव्यावर असताना त्यांना जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती असल्याने पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.याबाबद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे २०१९ मध्ये ही घटना घडली होती. हे प्रकरण सीआयडीकडे देखील सोपवण्यात आले होते.नाशिक रोड पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे.

आरबाज अजगर खान उर्फ गोलु खान असे संशयित आरोपीचे नाव आहे. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या . भुसावळ पोलीस ठाणे हद्दीतील समतानगर येथील जळगाव आरपीआय ( आठवले गट ) जिल्हाध्यक्ष , तसेच भुसावळ नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक रविंद्र बाबुराव खरात उर्फ हम्प्या दादा (रा. भुसावळ, जि. जळगाव) व त्याच्या घरातील इतर ४ सदस्य अशा एकूण ५ इसमाचा रिव्हॉलव्हरने फायर करून खून केला होता.तसेच इतर तीन जणांना गंभीर जखमी करून हत्याकांड घडवून आणले होते . सदरचे हत्याकांड घडवून आणल्यापासून गुन्हातील संशयित आरोपी आरबाज अजगर खान उर्फ गोलु खान हा फरारी झाला होता.

नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार अनिल शिंदे, विशाल पाटील , विष्णु गोसावी, मनोहर शिंदे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे यांचे पथक जेलरोड परिसरात पाण्याच्या टाकीजवळ पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी आरबाज अजगरला पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button