Jalgaon

?जळगांव Live…शिवसैनिकांनो कामाला लागा…गड जिंकायचे आहेत..खा संजय राऊत

?जळगांव Live…शिवसैनिकांनो कामाला लागा…गड जिंकायचे आहेत..खा संजय राऊत

चोपडा खा संजय राऊत हे आज जळगांव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.शिवसैनिकांनो अंगातील मरगळ झटकून विद्यूत लहरी संचारू द्या.. वाघ येताच तयार होणारे वातावरण आठवून बघा.. गर्दीच गर्दी उसळली पाहिजे अशी सेनेची तयारी झाली पाहिजे. येत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत सर्वत्र भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. यासाठी नुसत्या डरकाळ्या फोडून उपयोग नाही. तर सर्व सेना मावळ्यांनी दमदारपणे कामाला लागले पाहिजे. आपसात गट- तट असल्यास विसरून एकसंघपणे वज्र मुठ धारण करुन जोरदारपणे उत्तर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवून द्या असे जाहिर आवाहन खासदार संजय राऊत यांनी येथे आयोजित मेळाव्यात केले.

आपल्या भाषणात ते म्हणाले की मा बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राविषयी पाहिलेले अनेक स्वप्न अपूर्ण असून ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करणे जरुरीचे आहे. त्याकरिता येत्या जि. प., प. स. आणि नगरपालिका निवडणुकीत सर्व सेना मावळ्यांना “गड” जिंकायचा आहे. यासाठी आतापासूनच कामाला लागा. संधीचे सोने करणार आपले मावळे असल्याने आपण भगवा फडकविण्यात सज्ज असल्याची मला खात्री आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोर पाटील , सुधीरजी गडकरी, संजय सांवत, आ. सौ लताताई सोनवणे , कुणाल दराडे, कार्य सम्राट माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक प्रकाश पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र धनगर, नगरसेवक किशोर चौधरी, नगरसेवक राजाराम पाटील, शहराध्यक्ष आबा देशमुख,जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष विष्णू भंगाळे, सुनील बरडिया, कैलास बाविस्कर, जनार्दन कोळी, प. स. उपसभापती एम. व्ही. पाटील, जि. प. सदस्य, प, स. सदस्य, सेनेचे सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button