Jalgaon

?जळगांव Live…पद्मालय येथे आढळला बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह..परिसरात खळबळ..!आत्महत्या की हत्या..!

?जळगांव Live…पद्मालय येथे आढळला बेपत्ता तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह..परिसरात खळबळ..!आत्महत्या की हत्या..!

जळगाव : आज दुपारी पद्मालय – गालापूर जंगलात बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सदर तरुणाचा मृतदेह गेल्या 5 – 6 दिवसापासून मृतावस्थेत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. मयत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (22) रा. बोरगाव ता. एरंडोल असे आहे. सदर मयत तरुण विज मंडळात कामाला होता असे देखील समजते. प्रेमप्रकरणातून या तरुणाचा घातपात झाला असल्याची चर्चा आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की मयत ज्ञानेश्वर चव्हाण या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते असे बोलले जात आहे. या प्रेमप्रकरणातून तर या तरुणाने गळफास घेतला नसावा? किंवा त्याची हत्या करून आत्महत्या असण्याचा देखावा निर्माण केला असावा का..? या तरुणाचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची व तिचे लवकरच लग्न होणार असल्याची कुजबुज परिसरात केली जात होती.दरम्यान याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button