Jalgaon

जळगाव Live: ऑइल कंपनीत स्फोट..! दोन मजूरांचा होरपळून मृत्यु..!

जळगाव Live: ऑइल कंपनीत स्फोट..! दोन मजूर मृत्युमुखी..!

तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या एका कंपनीत ऑईलने भरलेल्या टाकीचा स्फोट झाल्याने या अपघातात दोन मजूरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.
मयत झालेल्या मजुरांमध्ये एक मध्यप्रदेशातील व दुसरा भुसावळ येथील असल्याचे समजते. सुनसगाव जवळील या फॅक्टरीत ऑईलने भरलेल्या टाकीला सदर मजूर हे वेल्डींगचे काम रीत असताना स्पार्कींग हेवून मोठा स्फोट झाला व या स्फोटात दोन्ही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे सपोनी प्रकाश वानखेडे व पोलीस कर्मचारी यांनी भेट देवून माहिती घेतली.
जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या एका केमिकल कंपनीत आज शुक्रवारी दुपारी भीषण स्फोट झाला. एका ऑइलच्या टाकीला वेल्डिंग केले जात असताना अचानक स्पार्किंग झाल्याने हा स्फोट झाला. स्फोटामुळे घटनास्थळाला आग लागली. या आगीत दोन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. या स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरीही हादरले. त्यांनी घाबरून घटनास्थळावर धाव घेतली.

दुपारी 12 वाजून 230 मिनिटांनी भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय- सूनसगाव रोडवरील केमिकल कंपनीता हा भीषण स्फोट झाला. कंपनीतील ऑइलच्या टाकीला वेल्डिंग सुरु असताना इलेक्ट्रिक वायरची स्पार्किंग झाली आणि स्फोट झाला. दिया कॉपर मास्टर अलायन्स अँड कंपनी या कंपनीत सदर घटना घडल्याची माहिती हाती आली आहे. स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोन मजूर होरपळून मृत्यूमुखी पडले. यापैकी एक मजूर भुसावळ येथील असून दुसरा मजूर मध्य प्रदेशातील
भुसावळ पोलीस घटनास्थळ

शुक्रवारी दुपारी झालेल्या या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरीही धावत आले. दरम्यान भुसावळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असून घटनास्थळावर ताबडतोब बचावकार्य सुरु करण्यात आले. नागरिकांनी येथील आग विझवून जखमींना रुग्णालयात भरती केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button