Jalgaon

Jalgaon Live: भाजपला दे धक्का..! दोन नगरसेवक शिवसेनेत दाखल..! कल और आज मिलाके पुरे 6..!

Jalgaon Live: भाजपला दे धक्का..! दोन नगरसेवक शिवसेनेत दाखल..! कल और आज मिलाके पुरे 6..!

जळगाव महापालिकेतील भाजपच्या दोन नगरसेवकांना फोडण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. काल चार जणांच्या प्रवेशानंतर आज आणखी दोन भाजपच्या नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे. नगरसेविका हसीनाबी शेख व नगरसेविका उषाबाई संतोष पाटील यांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. काल प्रवेश केलेले चार व आजचे दोन अशा पध्दतीने महापालिकेत शिवसेनेने ४२ चा नगरसेवकांचा बहुमताचा आकडा ओलांडला आहे.

आधीच्या व आताच्या प्रवेश झालेल्या सर्व नगरसेवकांच्या वॉर्डात निधी देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठक सुरू आहे. दरम्यान निधीच्या जोरावर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे भाजपला खिंडार पाडण्यात यशस्वी ठरले असून ६ भाजप नगरसेवकांना शिवसेनेत ओढून आणले आहे. दरम्यान आता महापालिकेत सेनेचे ४२ नगरसेवक झाले आहेत. पुढे हा आकडा ४४ वर जाईल, आगे आगे देखो होता है क्या, असे म्हणत मंत्री पाटील यांनी आणखी काही भाजपचे नगरसेवक सेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले आहेत.वर्षांत भाजपने दमडी आणली नाही. त्यांचे सरकार त्यांचाच जळगाव जिल्ह्यातला मंत्री असतानाही निधी मिळाला नाही. त्यामुळे विकासकामे नसल्याने वॉर्डांतील नागरिक भाजप नगरसेवकांवर नाराजी व्यक्त करत आहेत. तर, दुसरीकडे शिवसेना नगरसेवकांच्या वॉर्डात जोरदार विकासकामे सुरू असल्याने शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत निधी मिळून विकासकामे होतील म्हणुनच नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button