Jalgaon

?जळगांव Live…आजपासून जिल्हा अंतर्गत फिरण्यास देखील ह्या नियमांचे करावे लागेल पालन..!काय आहे नियम..!जिल्हाधिकारी यांनी जारी केले आदेश..!

?जळगांव Live…आजपासून जिल्हा अंतर्गत फिरण्यास देखील ह्या नियमांचे करावे लागेल पालन..!काय आहे नियम..!

महाराष्ट्र शासनाने दि. २१ एप्रिल, २०२१ रोजी Break The Chain संदर्भात
नियमावली प्रसिध्द केली आहे. सदर नियमावली जळगाव जिल्ह्यात दि. २२ एप्रिल, २०२१ रोजी रात्री ०८.०० पासुन ते दि. ०१ मे, २०२१ रोजी सकाळी ०७.०० वा. पर्यंत सदर नियम लागू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

यानुसार आंतरजिल्हा एका शहरातुन दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक व न टाळता जोगा प्रवास जसे की, वैद्यकिय उपचार, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यविधीला उपसि राहण्यासाठी, अथवा जीवनावश्यक सेवा पुरविणे इ.
साठीच मर्यादित आहे. नमूद करावयाच्या प्रवासाला कुठल्याही परवानगी/पास ची
आवश्यकता नाही. तथाप व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी प्रवास करण्याची मुभा नसल्याने त्यासाठी परवानगी/पास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केली जात नाही.

नियमावलीत नमुद कारणांशिवाय वा नियमावलीत नमूद नियमांचे पालन न करता
केलेला प्रवास हा र.रु.१०,०००/- पर्यंतच्या दंडनीय अपराध आहे व त्याचे तपासणीसाठी आवश्यक पथके कार्यरत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button