Jalgaon

?जळगांव Live…उद्यापासून जिल्हा अनलॉक..! पहा जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली नवीन नियमावली…

?जळगांव Live… उद्यापासून जिल्हा अनलॉक..! पहा जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली नवीन नियमावली…

जळगाव जिल्ह्यात उद्या ७ सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक जाहीर करण्यात आला आहे. शासन नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नियमावली जाहीर केली असून याचे काटोकोर पालन होणे आवश्यक आहे.

  • अनलॉक..! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

१) सर्व अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने : जिल्ह्यातील सर्व दुकाने ही नियमितपणे रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहतील.

२) शॉपींग मॉल, मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन सिनेमागृहे : ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील

३) हॉटेल, उपहारगृहे आदी : सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील

४) मैदाने, जॉगींग ट्रॅक, सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग :पूर्ववत सुरू करण्यात येतील.

५) सर्व खासगी कार्यालये : पूर्ववत पूर्ण वेळ खुली राहतील.

६) शासकीय कार्यालये : पूर्ण क्षमतेने खुली राहतील

७) क्रीडा/शुटींग आदी : आधीप्रमाणे नियमित राहतील. मात्र ५० टक्के क्षमता असावी.

८) सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम : दोन तासांच्या आत कार्यक्रम उरकावा लागेल. फक्त १०० लोकांची उपस्थितीला मान्यता.

९) विवाह व अंत्यंस्कार : फक्त ५० जणांना परवानगी.

१०) निवडणुका : सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी

११) कृषी संबंधीत दुकाने व कामे : पूर्ववत परवानगी

१२) बांधकाम : कोणतेही निर्बंध नाहीत

१३) जीम/सलून/ब्युटी पार्लर आदी : ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.

१४) सार्वजनीक वाहतूक : पुर्णपणे सुरू

१५) माल वाहतूक : पुर्ववत सुरू

१६) आंतर जिल्हा प्रवास : खुला. मात्र जिथे संसर्ग जास्त तेथे जाण्यासाठी वा तेथून येण्यासाठी ई-पास आवश्यक

१७) उद्योग : पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार

१८) सार्वजनीक ठिकाणी वावरणे : कोणतीही बंदी नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button