kalamb

?Big Breaking..कळंब शहरात दिवसाढवळ्या बंदूक घेऊन थरार पोलिसांच्या कार्यवाही कडे लक्ष

कळंब शहरात दिवसाढवळ्या बंदूक घेऊन थरार,पोलिसांच्या कार्यवाही कडे लक्ष

प्रतिनिधी;-सलमान मुल्ला

कळंब शहरात पुन्हा एकदा दिवसाढवळ्या भर रस्त्यात बंदुका काढण्याचा प्रकार घडला आहे. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालागत असलेल्या पारधी वस्तीत दोन गटात भांडण होण्याचा आकार दिसत असताना पुन्हा एकदा दिवसाढवळ्या रस्त्यावर बंदुका घेऊन फिरल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे शहरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाद सुरू असताना परिसरातील दुकानदारांनी लागलीच दुकाने बंद केली. या घोळक्यात दोन जण बिनधास्तपणे बंदुका घेऊन फिरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

याअगोदर बरोबर एकवर्षापूर्वी 7 जून रोजी पारधी समाजातील कार्यक्रमावरून दोन गटात वादावादी झाली होती. नंतर त्या भांडणाचे रूपांतर मोठ्या दंगलीत झाले होते. ज्यात कळंब शहरातील साठे चौकात बंदुका, तलवारी, लाठ्या काठ्याने मारहाण झाली होती. यात भर चौकात गोळीबार झाला होता, ज्यात 3 जण गंभीर जखमी झाले होते. आज पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उदभवते की काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button