Jalgaon

?जळगांव Live.. कोरोना Update… जिल्ह्यात आज 548 रुग्ण..चोपडा ठरतोय हॉट स्पॉट..!

?जळगांव Live.. कोरोना Update… जिल्ह्यात आज 548 रुग्ण..चोपडा ठरतोय हॉट स्पॉट..!

एकाच दिवसात 245 रुग्णांची कोरोनावर मात तर 24 तासात 2 रुग्ण मृत..!

जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे तब्बल 548 रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1396 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 62 हजार 650 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 57 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर गुरूवारी एकाच दिवसात 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गुरूवारी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण..
जळगाव शहर 248
जळगाव ग्रामीण 06
भुसावळ 46
अमळनेर 02
चोपडा 83
पाचोरा 01
भडगाव 00
धरणगाव 08
यावल 00
एरंडोल 03
जामनेर 45
रावेर 24
पारोळा 17
चाळीसगाव 45
मुक्ताईनगर 18
बोदवड 02
अन्य जिल्हा 02

24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 82 वर्षीय पुरूषाचा व बोदवड तालुक्यातील 51 वर्षीय पुरूषाचा डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव व मानस हॉस्पीटल, जळगाव येथे मृत्यू झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button