Jalgaon

?जळगांव Live… आणि जिल्हाधिकारी स्वतः उतरले रस्त्यावर..!सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक देखील..!

?जळगांव Live… आणि जिल्हाधिकारी स्वतः उतरले रस्त्यावर..!सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक देखील..!

जळगाव गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन आणि सर्वच यंत्रणा आपापल्या परीने प्रयत्न करत आहे परंतु नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे पाहून आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वत: शहरात फिरून पाहणी करत संबंधितांवर कारवाई केली.

आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरात फिरून विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, वाहतूक शाखेचे निरिक्षक देवीदास कुनगर व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.
शहरातील चित्रा चौक, गोलाणी मार्केट परिसरासह अन्य भागांमध्ये आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button