Jalgaon

जळगांव:भाजपला खिंडार..! 21 नगरसेवकानीं फुल सोडून बांधलं घड्याळ..!

जळगांव:भाजपला खिंडार..! 21 नगरसेवकानीं फुल सोडून बांधलं घड्याळ..!

जळगाव फार पूर्वी पासूनच भुसावळ मध्ये भाजपचा बोलबाला होता.पण एकनाथ राव खडसे यांनी जेंव्हा पासून हातात घड्याळ बांधलं तेंव्हा पासून मात्र जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची गणिते झपाट्याने बदलत आहेत.आता भुसावळ मध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे एकाच दिवशी एकाच वेळी भाजपच्या 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी हाती घड्याळ बांधलं.. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर खडसेंनी आधी भाजपला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत पारडे फिरवले, त्यानंतर भुसावळमध्येही खडसेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.

भुसावळमध्ये भाजपला एकनाथ खडसे यांनी खिंडार पाडताना तब्बल 21 नगरसेवकांना राष्ट्रवादीत आणले आहे. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचं जळगावमध्ये हे मोठे डॅमेज आहे, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांना खडसेंनी शह दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सोन्याची किंमत सर्वांनाच कळते असे नाही, असा टोला अजित पवार यांनी यावेळी भाजपला लगावलाय. एकनाथ खडसे यांनी 40 वर्षे भाजपसाठी काम केले, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्याने आनंद झाला, आता जळगाव जिल्हा राष्ट्रवादीमय करायचा आहे, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्या हस्ते विविध मागण्यांचे आणि संघटनेचे एकत्रित निवेदन अजित पवार यांच्याकडे दिले. जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा आपण मार्ग काढू असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला असता तर बरं झाले असते, जळगाव जिल्ह्यात आज परिस्थिती वेगळी असती, जळगावात राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे, खडसे आधी आले असते तर पूर्ण जिल्हा आपला असता, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button