sawada

ठोस प्रहारचे भागीत खरे – अखेर आला सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन या शैक्षणिक संस्थेचा वाद चव्हाट्यावर

ठोस प्रहारचे भागीत खरे – अखेर आला सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन या शैक्षणिक संस्थेचा वाद चव्हाट्यावर

“खरे काय खोटे काय हे वेळेवर सोडणे योग्य राहील मात्र मी काय कोणताही जि.प.शाळेतील शिक्षक नियम व निकषाची जाणीव असतांना खाजगी संस्था संचलित शाळेत मुख्याध्यापक म्हणून येऊच शकत नही.तसेच संस्था संचालकांच्या सर्वानुमतशिवाय शाळा कर्मचारी भरती करणे शक्यच नाही.तरी मी एकटा संचालक कोणालाही नवकरीचे अमिष देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.तरी शाळा समिती चेअरमन यांनी लावलेले सर्व आरोप निवड चोरांच्या उलट्या बोंबा व्यतिरिक्त दुसरे काहीच नाही. झारीतील शुक्राचार्य कोण? संस्थेत कोण मनमानी करीत आहे याचे कायदेशीर परिणाम लवकरच समोर येतील.
*शेख हनीफ शेख रशीद संचालक इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा*
—————————————

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेची शैक्षणिक संस्था इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळात सुरु असलेल्या अंतर्गत वादासंदर्भात “सावदा येथील अग्लो उर्दू शाळेची शैक्षणिक संस्था इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांमध्ये फुट? या मथळ्याखाली दि.२ मे २०२२ रोजीच्या ठोस प्रहार मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.यानंतर थेट सदर शैक्षणिक संस्थेचे संचालक व ॲंग्लो उर्दू हायस्कूलचे शाळा समिती चेयरमन यांनी मराठा दर्शन प्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांच्या सही शिक्याने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संस्थेचे काही असंतुष्ट लोकांनी शाळेचे इत्तेहाद एज्युकेशन या शैक्षणिक संस्थेचे वातावरण बिघडण्याचे प्रयत्नात असून एकीकडे सदर शाळेची प्रगती उन्नती मान्य करून दुसरीकडे संस्थेत मनमानी सुरू असल्याचे दोष लावू समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसून येते.

सदरील शैक्षणिक संस्थेचे शेख सुपडू शेख रशीद मंसुरी हे सचिव असून त्यांचे भाऊ व जि.प.शाळेचे (दांडी बहादुर) शिक्षक तथा संचालक शेख हनीफ शेख रशीद हे सदरची शैक्षणिक संस्थेत स्वतःचे वर्चस्व स्थापित करणे हेतू अँग्लो उर्दू हायस्कूल येथे शेख हनीफ मुख्याध्यापक पदी येण्याचा गैरपर्यत्न करीत होता. तसेच त्यांनी संस्थेतील काही संचालकांना त्यांचे नातेवाईकांना शाळेत नोकरीस लावून घेण्याचे खोटे आमिष दाखवून त्यांची दिशाभूल केलेली असून संस्थेमध्ये सदरील सचिव व त्यांचे भाऊ यांनी कागदपत्रांवर गैरप्रकारे काम केल्याचे लवकरच निष्पन्न होणार आहे.असा गंभीर स्वरूपाचा इशारा वजा आरोप शाळा समिती चेअरमन शेख इक्बाल शेख कादर मन्यार यांनी दिलेली मुलाखत व प्रसिद्धीपत्रकात केलेले असून यावर ते ठाम देखील आहे.तरी सदरील शैक्षणिक संस्थेची संचालकांमध्ये फुट पडल्याने उंट कोणत्या बाजूला बसतील याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button