Nandurbar

मुस्लिम समाजाच्या धार्मिक इज्तेमा व दही हंडी कार्यक्रम COVID 19 च्या पाश्र्वभूमी वर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुस्लिम समाजाच्या धार्मिक इज्तेमा व दही हंडी कार्यक्रम COVID 19 च्या पाश्र्वभूमी वर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.फहिम शेख नंदुरबारनंदुरबार : नंदुरबार शहरात मुस्लीम धर्मगुरु तर्फे दिनांक २७/०८/२०२१ ते २९/०८/२०२१ दरम्यान धार्मिक प्रवचन / ईज्तेमा कार्यक्रम आयोजित करणार होते . त्या अनुषंगाने दिनांक २४/०८/२०२१ रोजी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांनी शहर पोलीस स्टेशन, उपनगर पोलीस स्टेशन व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मशिदीचे मौलवी ट्रस्टी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीत सर्व मौलवींना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे बाबत सुचना देण्यात आल्या. सर्व मौलवींनां पोलीस प्रशासनाच्या सुचने प्रमाणे कोणताही धार्मिक प्रवचन/ इस्तेमा कार्यक्रम रद्द करणार बाबत सांगितले. पोलीस प्रशासना तर्फे सर्व मुस्लीम धर्मगुरु यांचे आभार मानण्यात येत आहेत.तसेच आगामी दहिहंडीच्या सणानिमित्त शहरातील सार्वजनिक दहिहंडी आयोजक यांना बोलावुन मिटींग घेण्यात आली. मिटींगमध्ये शासनाकडुन पारीत केलेले नियम सांगण्यात आले. त्यात कोणत्याही प्रकारे दहिंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही या बाबत सुचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे सर्व दहिहंडी आयोजकांनी दहिहंडी कार्यक्रम आयोजन करणार नसले बाबत सांगितले.. त्यामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व दहिहंडी आयोजकांचे देखील आभार मानण्यात येत आहेत.

संबंधित लेख

Back to top button