Kalwan

आदिवासी समाजातील लोकपरंपरा लोकसंस्कृती जतन व संवर्धन करणे समाजाची सामूहिक जबाबदारी

आदिवासी समाजातील लोकपरंपरा लोकसंस्कृती जतन व संवर्धन करणे समाजाची सामूहिक जबाबदारी

सुशिल कुवर कळवण

कळवण : आदिवासी समाजातील लोकपरंपरा, लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी लोकसंस्कृती व लोकपरंपरा या ऑनलाईन चर्चासत्राचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष मा श्री. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.

विधानसभा उपाध्यक्ष मा.नरहरी झिरवाळ म्हणाले, हा कार्यक्रम राज्यस्तरावर होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतिवीर बिरसा मुंडा, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, तंट्या भील, वीर एकलव्य, राणी दुर्गावती, डॉ. जयपालसिंह मुंडा यांच्या स्मृति जागृत करणे तसेच या माध्यमातून तरुणांना प्रेरणा मिळावी हा कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश आहे. आदिवासी समाजाने शिक्षण क्षेत्रात पुढे आले पाहिजे. आदिवासी समाज हा जिद्दी आणि कष्टाळू आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांचे हक्क, अधिकारबरोबर शिक्षणाची जोड मिळाल्यास हा समाज अधिक प्रगती करू शकेल. समाजातील सर्व लोकांनी लोककला आणि निसर्ग संवर्धन, परंपरा जोपासण्याचे प्रयत्न करावे असे आवाहन श्री झिरवाळ यांनी यावेळी केले आहे.

आदिवासी समाज निसर्गाला आपले दैवत मानतो आदिवासी समाज हा जंगलाचा रहिवासी असून जंगलातून मिळणाऱ्या उपजीविकेवर उदरनिर्वाह करतो. त्यामुळे जल, जंगल, जमीन आणि आदिवासी समाज यांची नाळ जोडली गेली आहे. आदिवासींच्या सक्षमतेवर अधिक भर देण्याची गरज आहे. आदिवासी समाजातील अनेक कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले असल्याचे श्री. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले आहे.

या चर्चा सत्रात डॉ. गणेश चंदनशिवे यांनी आदिवासींची सिद्धी धमाल याविषयी माहिती दिली. श्री करवीरदास यांनी आदिवासी नायकांचे राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान व श्री हेमराज उईके यांनी आदिवासी संस्कृती व भारतीय समाज तसेच श्रीमती माहेश्वरी गावित यांनी आदिवासी महिलांचे सांस्कृतिक योगदान तर कैलास महाले यांनी आयुर्वेद व आदिवासी समाज या विषयावर माहिती दिली.

संबंधित लेख

Back to top button