Rawer

सहकारातील ज्येष्ठांचा सन्मान करणे गरजेचे-प्रल्हाद बोंडे

सहकारातील ज्येष्ठांचा सन्मान करणे गरजेचे-प्रल्हाद बोंडे

निंभोरा येथील कार्यक्रमात व्यक्त केले मत.

निंभोरा-संदिप को ळी
सहकारात व राजकारणात जुन्या काळातील मार्गदर्शकणाचा सन्मान करणे गरजेचे असून तो मोलाचा ठेवा जतन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहकारातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद बोंडे यांनी निंभोरा येथील सहकारात व तालुक्यातील सहकार,समाजकारण, राजकारण,शैक्षणिक,कृषी विषयक आदी क्षेत्रात गेल्या ०५ दशकांपासून रुबाबदार व बेदाग ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते नरेंद्र तात्या पाटील यांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सन्मानाचा कार्यक्रमात केले. युवा रसिक मंडळ व कै. गिरधरशेठ किसान फ्रुटसेल सोसायटीच्या वतीने कै. महिपत विठोबा चौधरी विकास सोसायटीच्या सभागृहात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद बोंडे होते.यावेळी त्यांच्यासोबत गावातील सहकारात,समाजकारणात व विविध संस्था तसेच शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे डॉ एस डी चौधरी,विकास सोसायटीचे चेअरमन मोहन बोंडे,माजी चेअरमन दत्तात्रय पवार,दुर्गादास पाटील,हरेश्वर चौधरी,श्रीराम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अनिल ब-हाटे,बाळासाहेब पवार, मुंबई येथील भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे,शरद बोरनारे,नंदपाल दूध संस्थेचे चेअरमन सुधीर मोरे,सुनिल कोंडे,
शंकर बोरोले,गुणवंत भंगाळे,कृषी विद्यालयाचे प्राचार्य एम टी बोंडे,माजी ग्रा पं सदस्य रमेश येवले,सुपडू ब-हाटे,काशीनाथ शेलोडे,ग्रा पं सदस्य शेख दिलशाद,वासुदेव चौधरी,माधव ब-हाटे,नितीन भंगाळे,कैलास भंगाळे,निवृत्ती चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी नरेंद्र तात्या पाटील यांच्या अनेक आठवणी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितल्या. ते वयाच्या २४व्या वर्षी ग्रा पं सदस्य तर ३०व्या वर्षी तरुण सरपंच राहिले होते.गावातील मोठा जलकुंभ त्यांच्याच काळात झाला असून गावाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मोटारसायकलवर पुण्याला जाणारे ते पहिले तरुण सरपंच होते.गावाच्या व निंभोरा येथील सहकाराच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान असून ते आज ही विकास सोसायटी व फ्रुटसेल सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी राहून मार्गदर्शन देत आहेत.त्यांनी विविध संस्थांची पदे भूषविली.सूत्रसंचालन सुनील कोंडे यांनी प्रास्ताविक डॉ एस डी चौधरी यांनी तर आभार मोहन बोंडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलाकर पवार, माधव ब-हाटे,ज्ञानेश्वर पवार,मुरलीधर सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button