Amalner

यात्रे साठी गेलेल्या इसमाची दुचाकी चोरीस…

यात्रे साठी गेलेल्या इसमाची दुचाकी चोरीस…

अमळनेर:- तालुक्यातील लोण खु. येथील इसम मुडी प्रं. डांगरी येथे यात्रेनिमित्त गेला
असता त्याठिकाणाहून त्याची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना दि.1नोव्हेंबर रोजी रात्री घडली आहे.
लोण खु. येथील महेंद्र अरविंद शिंदे हे 1 नोव्हेंबर रोजी मुडी पं. डांगरी येथे यात्रेनिमित्त गेले असता रात्री 10 वाजता काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटरसायकल क्र. जीजे 05 एफ व्ही 1985 ही गोमाता मंदिरासमोर
लावली होती. रात्री 10-45 वाजता त्याठिकाणी परत आले असता मोटारसायकल आढळून आली नाही. त्यामुळे आजूबाजूच्या पटिसटात व गावात शोध घेतला असता त्याठिकाणी ही गाडी आढळून आली नाही. त्यावरून सदर मोटारसायकल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्याने मारवड पोलिसात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button