Yawal

हिंगोणा मोर धरणाच्या पाण्यात बुडून आदीवासी गुरेढोरे चारणाऱ्या इसमाचा दुदैवी मृत्यू पोलीसात नोंद

हिंगोणा मोर धरणाच्या पाण्यात बुडून आदीवासी गुरेढोरे चारणाऱ्या इसमाचा दुदैवी मृत्यू पोलीसात नोंद

यावल ( शब्बीरखान ) तालुक्यातीत हिंगोणा शिवार या क्षेत्रात असलेल्या मोर धरण येथील रहिवासी आदीवासी गुलशेर सुमाऱ्या बारेला वय ५२ हे मोर धरणाच्या परीसरातील जंगलात गुरे चारण्यास गेले असता मोर नदीपात्रात त्यांचा पाय घसरल्याने तोल जावुन त्यांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन , फैजपुर पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . दरम्यान मोर धरणाच्या परिसरातील जंगलात दिनांक २२ रोजी गुलशेर बारेला हे गुरे चारण्यासाठी गेले असता धरणाच्या पाण्यात पाय घसरून तोल जावुन पाण्यात पडुन बुडुन मरण पावल्याची घटना घडली आहे. गुलशेर बारेला हे दुपारच्या सुमारास घडली परंतु त्यांचा मृतदेह हा दि २३ रोजी हा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मिळुन आला , यावेळी हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज तडवी यांनी मयत गुलशेर बारेला याच्या मृतदेहाचे घटना स्थळीच शवविच्छेदन केले . सदर घटनेचे माहीती हिंगोणा येथील पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी फैजपूर पोलीस स्टेशनला दिल्याने पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरेश्वरआखेगावकर ,पोलिस हेड कॉन्स्टेबल सूरदास किरण चाटे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरदास हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button