Mumbai

IPL आता vivo ऐवजी TATA IPL..

IPL आता vivo ऐवजी TATA IPL..

मुंबई इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) टायटल स्पॉन्सरशिपमध्ये बदल झाला आहे. आता चिनी मोबाइल उत्पादक कंपनी Vivo ऐवजी टाटा समूह IPL चा टायटल स्पॉन्सर असणार आहे. आज IPL च्या गर्व्हनिंग काऊन्सिलची बैठक झाली. त्याता हा निर्णय घेण्यात आला. ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. टायटल स्पॉन्सर म्हणून टाटा समूह आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे.Vivo ने 2018 साली वर्षाला 440 कोटी रुपयांचा पाच वर्षांसाठी करार केला होता. 2022 मध्ये हा करार संपणार होता. सीमेवरील तणावामुळे विवोने 2020 मध्ये करार स्थगित केला होता. पण त्यानंतर चिनी मोबाइल उत्पादक कंपनीने कराराचा आदर करत 2021, 2022 आणि 2023 पर्यंत स्पॉस्नरशिप देण्याचे आश्वासन दिले होते. 2020 मध्ये ड्रीम 11 ने टायटल स्पॉन्सरशिपची जबाबदारी उचलली. 2021 मध्ये पुन्हा विवो टायटल स्पॉन्सर होता.2023 च्या मोसमापर्यंत VIVO च्या जागी टाटा समूह आयपीएलचा टायटल स्पॉन्सर असणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात एकूण 10 टीम्स असणार आहेत. यात अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ आहेत. IPLआता विवो आयपीएल नाही, तर टाटा आयपीएल म्हणून ओळखली जाईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button