Rawer

आमदार शिरीष चौधरी यांच्याकडून रावेर येथील अपघातग्रस्त महिलेची विचारपूस

आमदार शिरीष चौधरी यांच्याकडून रावेर येथील अपघातग्रस्त महिलेची विचारपूस

रावेर : रावेर येथील पती पत्नीचा बऱ्हाणपूर येथे अपघात झाला होता. त्या महिलेची आज मुबंई येथील जे जे दवाखान्यात रावेर यावल तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी या अपघातग्रस्त महिलेची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

या बाबत अधिक माहिती असेकी रावेर शहरातील नागझिरी येथील रहिवासी नासिर शेख हे आपल्या पत्नी अफसाना बी सोबत बऱ्हाणपूर येथील काही कामा करीता गेले होते त्यांचा बऱ्हाणपूर येथील हमीदपुरा भागात अपघात झाला होता पुडील उपचारासाठी फैजपूर येथील दाखल करण्यात आले होते येथील डॉकटर यांनी त्या महिलेला मुंबई येथे जे जे रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते त्या अपघातग्रस्त महिलेची आज रावेर तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी
यांनी जे जे रुग्णालयात जाऊन भेट देऊन विचारपूस केली व जे जे रुग्णालयाचे प्रशासनाशी संपर्क साधून पुडील उपचार पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सुरु असलेल्या मदत कार्यावर आमदार स्वतः लक्ष ठेवून आहेत व सातत्याने परिस्थितीचा व उपचार सुविधेचा आढावा देखील घेत आहे.आमदार शिरीष चौधरी यांनी जे जे रुग्णालयाचे डीन श्री रणजित मानकेश्वर, व तात्याराव लहाने यांच्याशी रुग्ण सुविधा बद्दल ही चर्चा केली. तसेच रुग्ण व त्याचे नातेवाईकांची काय व्यवस्था आहे कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये अशी चर्चा
रुग्णांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. तसेच आमदार यांनी शक्य ती मदत कार्याचे आश्वासन अपघातग्रस्तांना दिले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button