Faijpur

धनाजी नाना महाविद्याल,फैजपुर येथे आंतर विभागीय भारतोलन,शक्तितोलन व शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न

धनाजी नाना महाविद्याल,फैजपुर येथे आंतर विभागीय भारतोलन,शक्तितोलन व शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर- येथील धनाजी नाना महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव अंतर्गत आंतर विभागीय पुरूष आणि महिला दोन्ही गटांसाठी भारतलोन व शक्तितोलन स्पर्धा तसेच पुरूष गटासाठी शरीर सौष्ठव अश्या वेगवेगळ्या तीन स्पर्धां घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांच्या एकत्रित उद्घाटन करून स्पर्धांची सुरुवात करण्यात आली, उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ सतिश चौधरी आणि उद्घाटक म्हणून फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे तसेच प्रा.डॉ.मुकेश पवार, प्रा.डॉ.दिनेश तांदळे,प्रा.सुभाष वानखेडे, प्रा.क्रांती क्षीरसागर प्रा. उमेश पाटील, प्रा.तेजस शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सतिश चौधरी सर यांनी स्पर्धकांना संबोधित करताना महाविद्यालयात विविध क्रीडा प्रकारांच्या आयोजनामगची भूमिका समजावून सांगितली तसेच स्पर्धांच्या अयोजनात महाविद्यालयाचे योगदानाबद्दल अवगत केले व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक डॉ.कुणाल सोनवणे यांनी खेळाला करिअरच्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे,कोणत्याही खेळातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळवल्यावर सरकारी अधिकारी होता येते यासाठी काही उदाहरण देत त्यांनी विजय चौधरी, ओंकार ओतारी, सुहास खामकर, नर्सिंग यादव या खेळाडूंची आठवण करून दिली व आपण ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला खेळ उत्तम करावा व करियर घडवावे असे सांगतांना धनाजी नाना महाविद्यालय व संस्थेचे सर्व पदाधिकारी सदैव आपल्या सोबत आहेत म्हणून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गोविंद मारतळे व आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले व लगेचच स्पर्धा सुरू करण्यात आल्या आंतर विभागीय स्तरावर पुरुष व महिला दोन्ही गटांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला भारतोलन, शक्तितोलन आणि शरीर सौष्ठव स्पर्धेत पुरुष गटातून जळगाव, एरंडोल व धुळे या तीन विभागातील पुरूष आणि महिला खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला.
भारतोलन,शक्तितोलन तसेच शरीर सौष्ठव या तिन्ही गटात जळगाव विभागाने प्रथम क्रमांक पटकावला तसेच एरंडोल विभागाने भारतोलन स्पर्धेत व्दितीय तर धुळे विभागाने तृतीय क्रमांक मिळवला,
मात्र शक्तितोलन व शरीर सौष्ठव या दोन्ही स्पर्धेत धुळे विभागे सरस कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला व एरंडोल विभागाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
पंच म्हणून श्री.अविनाश महाजन, योगेश महाजन, तुषार सपकाळे, उमेश कोळी, कल्पेश महाजन, अल्लाउद्दीन तडवी, नजीर तडवी, योगेश तडवी उपस्थित होते.
तसेच विद्यापीठाचा संघ निवडण्यासाठी निवड समितीचे सदस्य व मुख्य पंच म्हणनू प्रा.डॉ.मुकेश पवार, प्रा.डॉ.दिनेश तांदळे व प्रा.डॉ.गोविंद मारतळे यांची भूमिका महत्वाची ठरली.

स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात डॉ. मुकेश पवार, प्रा.डॉ.दिनेश तांदळे, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा.क्रांती क्षीरसागर, प्रा.उमेश पाटील,श्री.आर.डी.ठाकूर श्री.अविनाश महाजन,योगेश महाजन, तुषार सपकाळे, उमेश कोळी आदींनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button