Pandharpur

पांडुरंग (तात्या) माने यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्णाकृती मूर्ती स्थापना व ऑफिस उदघाटन

पांडुरंग (तात्या) माने यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्णाकृती मूर्ती स्थापना व ऑफिस उदघाटन

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर पै. पांडुरंग तात्या माने यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांची पूर्णाकृती मूर्ती स्थापना व पांडुरंग तात्या माने फाउंडेशन ऑफिस चे उदघाटन त्यांची पत्नी सुरेखाताई पांडुरंग माने यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली पंढरी मध्ये जसे लॉकडाउन चालू झाले तसे पांडुरंग तात्या माने फाउंडेशन यांनी अन्न दानाचे कार्य सलग शंभर दिवस कार्य केले आहेत. ही संस्था मागील तीन वर्षा पासून कार्यरत आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. पण अनोखा उपक्रम सुरेखाताई माने यांनी त्यांच्या पतीचे पूर्णाकृती मूर्ती स्थापना करून पंढरीत इतिहास रचला आहे. पती हाच पतीदेव हे त्यांनी मूर्ती स्थापना करून त्यांचे प्रेम सिद्ध केले आहे.यावेळी गणेश माने दिनेश माने व संस्थापक अध्यक्ष निलेश माने बोलताना म्हणाले हे ऑफिस नसून आमच्या साठी एक मंदिर आहे आणि इथे समस्या घेऊन येणार्या नागरिकांची अडचन आम्ही नक्की दूर करू..यावेळी उपस्थित अभिजीत आबा पाटील धाराशिव साखर कारखाना चेअरमन, युवा नेते प्रणव परिचारक, धनंजय नाना कोताळकर, अरुण भाऊ कोळी, गणेश अंकुशराव, लक्ष्मण पापरकर, रामचंद्र धोत्रे, महेश चव्हाण, अनिल अभंगराव, संजय बाबा ननवरे, नगरसेवक सुरेश नेहतराव, नगरसेवक सुधीर धोत्रे, ऋषिकेश बडवे, विनायक संगीतराव, अनिल माने, अर्जुन चव्हाण, संजय माने, युवराज कोताळकर, दत्ता तारापूरकर, तेजस अभंग, उमेश जाधव, संकेत श्रीखंडे, राजा गावटे, बबन शिंदे व इतर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button