Chopda

प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम चोपड्यात पत्रकारांचे लसीकरण संपन्न

प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
चोपड्यात पत्रकारांचे लसीकरण संपन्न
चोपडा : पत्रकार हा समाजाचा अविभाज्य घटक असून प्रशासना सोबत सर्वच परिस्थितीत काम करत असतो.कोरोना काळात सुद्धा पत्रकार समाज जागृतीचे कार्य आपला जीव धोक्यात घालून करीत आहेत.त्यामुळे पत्रकार बांधवांना फ्रंट लाईन्स वर्कर चा दर्जा देऊन त्यांना परिवारासह कोविड लसीकरणाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी.अशा आशयाचे निवेदन चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने अध्यक्ष शाम जाधव,सचिव लतीश जैन यांनी तहसीलदार अनिल गावीत यांना दिले होते.
सदर निवेदनाची तात्काळ दखल घेत चोपडा तहसीलदार अनिल गावीत यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांना सूचना केली होती. त्याअनूशंगाने आज दिनांक 22 रोजी चोपडा नगर परिषदेच्या रुग्णालयात दुपारी 3 वाजता पत्रकार व त्यांच्या परिवारा साठी लसीकरण कँप लावण्यात येऊन सर्वांना कोविशील्ड लस देण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष शाम जाधव,सचिव लतीश जैन,पत्रकार श्रीकांत नेवे,सौ.रंजना नेवे,संदीप ओली,आर.डी.पाटील,भगवान नायदे,उमेश नगराळे,सचिन जैस्वाल,गणेश बेहरे,शुभम माळी,ललित सुतार डी.बी.पाटील,राकेश पाटील आदी हजर होते.लसीकरणासाठी न.पा.रुग्णालयाचे आरोग्य सहायक जगदीश बाविस्कर,सचिन शिंदे,
आरोग्य सेविका सुनीता पावरा,दिपाली सोनवणे
आशा स्वयंसेविका पल्लवी सोनवणे,संजना विसावे,संगणक चालक विवेक कोतवाल यांनी
परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button