Betawad

महिंदळे येथील मागासवर्गीय कुटुंबाला अमानुष मारहाण! विनयभंग, मारहाण,व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, महिदंळेत तणावपुर्ण शांतता..

महिंदळे येथील मागासवर्गीय कुटुंबाला अमानुष मारहाण! विनयभंग, मारहाण,व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, महिदंळेत तणावपुर्ण शांतता..

भडगांव – तालुक्यातील मंहिदळे येथील रहिवाशी अनुसुचित जातीचे कुटुंब दगडु घमा सोनवणे यांच्या कुंटुबातील ७ जणांना गावातील सवर्ण समाजाच्या गांव गुंडाकडुन महिलासह पुरूषांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे याबाबत भडगांव पो.स्टे.ला विनंयभंगासह मारहाण व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ७/६/२०२० रोजी ७: ३० वाजे सुमारास महिंदळे येथील रहिवाशी दगडु घमा सोनवणे हे आपल्या घरा समोरील पंचशिल चौकात बसले असता त्या ठिकाणी गावातील गांवगुंड अशोक राजेंद्र पाटील, अरुण लहु पाटील, अमोल भागवत पाटील, पृथ्वीराज दिलीप पाटील असे हे हातात लाकडी दांडके, स्टिलचा पाईप घेवुन जोर जोरात हर हर महादेव असे आरोळ्या मारत आले तेव्हा दगडु सोनवणे, याने त्यांना बोलले की तुम्ही मोठ मोठयाने आरोळ्या का मारतात असे बोलण्याचा राग त्यांना आल्याने व मागील भांडणाच्या कारणावरून अशोक राजेंद्र पाटील याने जातीवाचक शिविगाळ करीत तुम्ही मातले आहे तुम्हांला बघावे लागेल असे म्हणुन त्या सर्वानी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने, स्टिलच्या पाईपने दगडु घमा सोनवणे, प्रगती दगडु सोनवणे, प्रकाश परशुराम खैरणार,रत्ना प्रकाश खैरनार, ज्ञानेश्वर किशोर खैरनार, वाल्मीक उत्तम खैरनार, सोनु अशोक सपकाळे यांना अमानुष मारहाण करीत डोक्याला गंभीर दुखापत केली तसेच यातील महिलांना मारहाण करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणुन यातील सशंयित आरोपी-अशोक राजेंद्र पाटील,अरुण लहु पाटील, अमोल भागवत पाटील, पृथ्वीराज दिलीप पाटील यांच्या विरुद्ध भडगांव पोलीस स्टेशनला ३५४,३२४,२९४, ५०४,५०६,३४ तसेच अनुसुचीत जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत पुढील तपास डि.वाय.एस.पी कैलास गांवडे हे करीत आहे.घटनास्थळी-डि.वाय.एस.पी कैलास गांवडे, पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे, पो.ना.लक्ष्मण पाटील,स्वप्नील चव्हाण, यांनी घटनास्थळी भेट देवुन सदरच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन महिंदळे गावात पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असुन गावात तणाव पुर्ण शांतता निर्माण झाली आहे .

Leave a Reply

Back to top button