Bollywood

इंडियन आयडॉल फेम पवनदीप आणि अरुणीता अडकले विवाह बंधनात..!

इंडियन आयडॉल फेम पवनदीप आणि अरुणीता अडकले विवाह बंधनात..!

मुंबई नुकतेच छोट्या पडद्यावर इंडियन आयडॉल हा गाण्यांचा शो संपन्न झाला. यातील सर्वात जास्त प्रसिद्ध जोडी म्हणजे अरुनिता आणि पवनदीप राज हे होत.दोघेही त्यांच्या असामान्य आवाज आणि केमिस्ट्री मुळे लोकांचे आवडते होते. नुकताच ह्या शो चा विजेता म्हणून पवनदीप आणि दुसरी विजेता म्हणून अरुनिता ह्यांची निवड झाली होती. दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.आता ह्या दोघांचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दोघे नव्या जोडप्याप्रमाणे दिसत आहे.

या फोटोमध्ये अरुणिता कांजीलाल लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये तर पवनदीप शेरवानीमध्ये आहे. दोघांच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. काही चाहत्यांनी पवनदीप आणि अरुणिताला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी मात्र एडिटिंग उत्तम प्रकारे केली असल्याचे म्हटले आहे. तर अरुणिता आणि पवनदीपच्या चाहत्यांनी खरेच लग्न करणार का? असा प्रश्न देखील विचारला आहे.
दरम्यान या फोटोवर अरुणिता आणि पवनदीपने याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल या दोघांची ओळख इंडियन आयडॉल शोमध्ये झाली. त्यांच्या लव्ह अँगलची चर्चा प्रेक्षक,जज,आणि स्पर्धक यांनी देखील हलके फुलके थट्टा केली जात होती. आता शो संपला असूनही दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Back to top button