India

India: “ह्या” दोन जेष्ठ  कलाकारांनी नाकारले पद्म पुरस्कार..!

India: “ह्या” दोन जेष्ठ कलाकारांनी नाकारले पद्म पुरस्कार..!

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना गौरवण्यात आलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या यादीत ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी- मुखोपाध्याय यांचा देखील समावेश होता. मात्र त्यांनी पुरस्कार नाकारला आहे.
पद्म पुरस्काराच्या सन्मानासाठी संध्या मुखर्जी- मुखोपाध्याय यांची संमती घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी त्यास नकार दिला.
यावर संध्या मुखर्जी यांच्या कन्या सौमी सेनगुप्ता (Soumi Sengupta) म्हणाल्या की, त्यांच्या आईने दिल्लीहून फोन केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, त्या प्रजासत्ताक दिनाच्या सन्मान यादीत पद्मश्रीसाठी (Padma Awards 2022 ) नामांकित होण्यास तयार नाही. त्यांच्या संमतीसाठी संध्या यांना संपर्क करण्यात आला होता.
आठ दशकांची गायन कारकीर्द असताना, वयाच्या 90 व्या वर्षी पद्मश्रीसठी त्यांची निवड होणे हे लांच्छनास्पद आहे. पद्मश्री एखाद्या नवीन कलाकाराला देणे योग्य आहे का ? असा प्रश्न सेनगुप्ता यांनी उपस्थित केला. तसेच ‘गीताश्री’ असलेल्या संध्या मुखर्जी -मुखोपाध्याय यांना. त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या गाण्यांच्या सर्व रसिकांना देखील तेच वाटतं. त्यांच्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिल्याचे सेनगुप्ता यांनी सांगितले.
सध्या देशभरात पद्मश्री पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र अनेकांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला असल्याचे देखील समोर येत आहे. एकीकडे पद्मश्री पुरस्कार हा देशातील प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये मोडला जातो, तरीही त्याचे फारसे महत्व राहिले नसल्याचे सध्या दिसत आहे. त्यात प्रसिद्ध तबलावादक अनिंदो चटर्जी यांनी देखील हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहीर झालेल्या पद्मश्रीची माहिती देताना पंडित अनिंदो चटर्जी म्हणाले, मला मंगळवारी दिल्लीतून पुरस्कार स्विकारण्याबाबत संमतीसाठी फोन आला. मात्र, मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी धन्यवाद म्हटलं, मात्र करियरच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्विकारण्यास तयार नसल्याचं कळवलं. मला १० वर्षांपूर्वी हा पुरस्कार मिळाला असता तर मी आनंदाने स्विकारला असता. माझ्यासोबतचे आणि अगदी माझ्या कनिष्ठांना देखील हा पुरस्कार आधीच मिळाला आहे. त्यामुळेच मी माफी मागत खूप नम्रपणे हा पुरस्कार स्विकारू शकत नाही असं कळवलं, अशी माहिती पंडित अनिंदो चटर्जी यांनी दिली.
बंगालच्या संगीत विश्वातून पुरस्कार मिळूनही तो नाकारणारे चॅटर्जी दुसरे व्यक्ती ठरले आहेत. पंडित अनिंदो चटर्जी यांनी २००२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी याआधीच राष्ट्रपती भवनमध्ये देखील तबलावादन केलंय. १९८९ मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये सादरीकरण करण्याचा मान मिळालेले ते सर्वात तरूण तबलावादक होते. पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी या आधी पंडीत रवीशंकर, उस्ताद अमजद अली खान आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबत संगीत मैफील गाजवली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button