Amalner

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग…पातोंडा येथे राष्ट्रध्वज उलटा फडकवल्या प्रकरणी ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी

?️ ठोस प्रहार ब्रेकिंग…पातोंडा येथे राष्ट्रध्वज उलटा फडकवल्या प्रकरणी ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी…प्रा जयश्री दाभाडेपातोंडा ता.अमळनेर – येथे आज स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी ग्रा.पं. प्रांगणातील राष्ट्रध्वज उलटा फडकल्या प्रकरणी ग्रामस्थांकडून ग्रामसेवक बी वाय पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाई ची मागणी केली जात आहे.?️ ठोस प्रहार ब्रेकिंग...पातोंडा येथे राष्ट्रध्वज उलटा फडकवल्या प्रकरणी ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणीआज ध्वजारोहण प्रसंगी ग्रामसेवक यांनी ध्वजरोहणाची पुर्व तयारी स्वतः केली होती. परंतू राष्ट्रध्वज उलटा फडकल्याने उपस्थित उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांना जाब विचारला असता ग्रामसेवकांनी अपमानास्पद व अरेरावीची भाषा वापरली. ग्रामस्थांनी घडलेल्या प्रकाराबाबत जाहीर माफी मागायला सांगीतल्या नंतर घडलेल्या प्रकाराबाबत मी कोणतीही माफी मागणार नाही त्यामुळे ग्रामस्थामंधून प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. सदर ग्रामसेवकाच्या बाबतीत स्वतः उपसरपंच , ग्रा पं सदस्य व ग्रामस्थांनी या आधीच त्यांच्या बेशिस्त वर्तणूक बाबत गट विकास अधिकारी अमळनेर यांचे कडे लेखी तक्रार केली आहे. ग्रामस्थांनी गावातील समस्यांबाबत विचारणा केली असता प्रशासकीय कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात. शासनाने गंदकी मुक्त अभियान राबवण्याची सुरूवात केली परंतू गावात अस्वच्छतेचा महापूर असल्याची तक्रार नितीन बिरारी यांनी केली असता मी तुमचा नोकर नाही तुम्हाला जे करायचे ते करा असे उत्तर दिले.?️ ठोस प्रहार ब्रेकिंग...पातोंडा येथे राष्ट्रध्वज उलटा फडकवल्या प्रकरणी ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणीआज ध्वजारोहण प्रसंगी राष्ट्रध्वज उलटा फडकल्यावर मात्र ग्रामस्थांचा राग अनावर झाला व सदर प्रकार गंभीर असून देशाचा व राष्ट्रध्वजाचा अपमान असून या प्रकरणी ग्रामसेवक बी वाय पाटील यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाची तोंडी व लेखी तक्रार उपसरपंच सोपान लोहार, ग्रा पं सदस्य गजानन पाटील , भुरा संदानशिव, सागर मोरे, चंद्रशेखर लोहार, प्रकाश पाटील, गिरीश पवार, राहुल पाटील, प्रविण लाड, किशोर देवरे, नितीन बिरारी, नरेश पाटील, दिलीप बोरसे, अविनाश बोरसे, भगवान पाटील, मोहित पाटील, भूषण पाटील, रोहित पाटील, अविनाश पाटील, दिनेश पाटील यांनी गटविकास अधिकारी अमळनेर यांचे कडे केली आहे.

राष्ट्रीय कार्यक्रमाच्या दिवशी राष्ट्रध्वजाच्या ध्वजारोहणापासून ते ध्वजावरोहणापर्यंतची सर्व जबाबदारी ग्रामसेवकाची असल्याने राष्ट्रध्वज अवमान प्रकरणी ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे ” – गजानन पाटील ग्रा पं सदस्य व माजी सरपंच पातोंडा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button