World

भारत पाक T20 थोड्याच वेळात दुबईच्या मैदानात..! इंशाअल्लाह पाकिस्तान भारताला..!सामन्याच्या ठीक आधी पहा काय म्हणाले इम्रान खान..!

भारत पाक च्या T20 थोड्याच वेळात दुबई च्या मैदानात..! इंशाअल्लाह पाकिस्तान भारताला..!सामन्याच्या ठीक आधी पहा काय म्हणाले इम्रान खान..!

आज फक्त आणि फक्त भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची चर्चा सर्वत्र आहे. दुबईच्या मैदानावर थोड्या वेळेत दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. टी-२० विश्वचषकाचा हा सर्वात मोठा सामना आहे. दोन्ही देशांचे चाहते आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू आपापल्या संघांबाबत प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनीही पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या सामन्यापूर्वी इम्रान खानच्या कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानी संघाच्या विजयाची आशा व्यक्त करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी निवेदनात म्हटले आहे. या संघात भारताला हरवण्याची प्रतिभा आहे. इंशाअल्लाह पाकिस्तान संघ या सामन्यात भारतीय संघाला नक्कीच पराभूत करेल.
इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघही भारताला विश्वचषकात हरवू शकलेला नाही. 1992 पासून पाकिस्तान भारताकडून वारंवार हारत आहे आणि त्यावेळी इम्रान खान कर्णधार होते. त्यानंतर टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला ७ वेळा पराभूत केले आहे. याशिवाय टी-२० विश्वचषकातही पाकिस्तानला भारताच्या हातून ५ वेळा पराभूत व्हावे लागले आहे.
आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला खात्री आहे, की त्याचा संघ टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताला हरवेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button