Akola

स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा एकजुटीच्या बळावर कोरोनावर मात करु-ना. बच्चू कडू

स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
एकजुटीच्या बळावर कोरोनावर मात करु- ना बच्चू कडू

कोविड १९ या विषाणू संसर्गाच्या जागतिक संकटाचा आपण अभूतपूर्व एकजुटीने सामना करत आहोत. त्यामुळे या संकटावर आपण नक्कीच मात करु

योगेश पवार

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधानपरिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने वाजविलेल्या राष्ट्रगिताच्या धुनवर राष्ट्रगीत गायन करुन उपस्थितांना आपल्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर उपस्थितांनी यावेळी सामाजिक अंतर राखले होते.

देशासाठी स्वातंत्र्य संग्रामात त्याग आणि बलिदान केलेल्या हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक यांच्या त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले. कोविड १९ या विषाणू संसर्गाच्या जागतिक संकटाचा आपण अभूतपूर्व एकजुटीने सामना करत आहोत. त्यामुळे या संकटावर आपण नक्कीच मात करु, असा मला ठाम विश्वास आहे. या संकटकाळात सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्रशासनातले कर्मचारी- अधिकारी या साऱ्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्यशक्तीमुळे शक्य झाले.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योगपूर्ण गाव ही योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा यांचे स्मरण राहण्यासाठी पुस्तकरुपी संकलन करण्यात येईल . कोरोना संकटावर मात करतांना सर्व अधिकारी कर्मचारी, आरोग्य व प्रशासन यंत्रणा यांच्या अथक परिश्रमातून अकोला जिल्हा राज्यात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा दर असणारा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे, हे कौतूक करण्या योग्य आहे. एकजुटीने कोरोना विरुद्धचा लढा आपण जिंकू असा विश्वास मला आहे.असे यावेळी ना बच्चू कडू यांनी सांगितले

त्यानंतर समारंभास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक , विरमाता, विरपत्नी, कोविड योद्धा यांची भेट घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button