Nandurbar

एस. टी. कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बेमुदत उपोषण

एस. टी. कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बेमुदत उपोषण

नंदुरबार फहिम शेख

नंदुरबार आज दि. २७/१०/२०२१ पासून महामंडळाच्या नंदुरबार आगारातील संयुक्त कृती समितीच्या वतीने संघटने मधील पदाधिकाऱ्यांचे खालील मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे त्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे,

१) वाढीव महागाई भत्ता थकबाकी:- सध्या एस.टी. कर्मचाऱ्यांना फक्त १२% महागाई भत्ता मिळत आहे परंतु शासनाने जुलै २०१८ पासून वेळोवेळी जाहीर केलेला महागाई भत्ता एस. टी. कामगारांना देणेत आलेला नाही तो फरकासह देणेत यावा. सध्या शासनाने २८%, जाहीर केलेला आहे. घरभाडे भत्ता:- सध्या एस. टी. कामगारांना ७% व १४% मिळत आहे. परंतु शसनाने ८% १६%, २४% वाढ जाहीर केली आहे.

३) वेतनवाढीचा दर सध्या एस. टी. कर्मचाऱ्यांना २% मिळतो परंतु शासनाने ३% जाहीर केलेला आहे.

४) सन उचलः सध्या एस. टी. कर्मचाऱ्यांना रक्कम १०,०००/- मिळते परंतु कामगार करारात रक्कम रु. १२,५०० / मंजूर केलेला आहे. तसेच दिवाळी भेट म्हणून रक्कम रु. १५,०००/- दिवाळीपूर्वी देण्यात यावी.

६) दरमहा वेळेवर वेतन मिळावे.

७) शासनात विलनिकरण करावे. या प्रमुख मागण्यांसाठी नंदुरबार आगारातील कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना, महाराष्ट्र एस. टी. वर्कर कॉंग्रेस (इंटक), महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना ई. संघटनेचे पदाधिकारी बेमुदत उपोषणास बसले आहेत. सदर उपोषणामध्ये आगारातील अध्यक्ष शेरीफ मन्सुरी, जी. एस. ठाकरे, जाधव गोकुळ, दिनेश के. सोनार, रविंद्र पाटील, रविंद्र वैरागी, सुनिल पाटील, व इ. पदाधिकारी सहभागी झाले होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button