Pune

इंदापूर तालुक्याच्या सुपुत्रास आसाम मध्ये वीरमरण आसाम मध्ये भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर होते कार्यरत बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर पसरली शोककळा

इंदापूर तालुक्याच्या सुपुत्रास आसाम मध्ये वीरमरण
आसाम मध्ये भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावर होते कार्यरत बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर पसरली शोककळा

दत्ता पारेकर पुणे

पुणे : इंदापूर तालुक्यातील मौजे बोराटवाडी गावचे लक्ष्मण सतू डोईफोडे ( वय ४५ वर्षे ) हे आसाम राज्यात कर्तव्यावर असताना दि.२३ फेब्रुवारी रोजी शहीद झाले आहेत.

सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे सिग्नल रेजिमेंट आसाम या ठिकाणी सुभेदार म्हणून आपल्या पदावर कार्यरत होते. गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे. लक्ष्मण डोईफोडे यांच्या निधनाची माहिती कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

वीरमरण आलेले लक्ष्मण डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. डोईफोडे परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे बोराटवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ डोईफोडे परिवाराच्या दुःखात सामील असून या घटनेने संपूर्ण इंदापूर तालुक्यातील युवक ,नागरिक, मित्र परिवार मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवार दि.२६ रोजी सकाळी ८.०० वाजता पार्थिव बोराटवाडी येथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर सकाळी ९.०० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button