इंदापूर

इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक पडली पार

इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक पडली पार

दत्ता पारेकर
इंदापूर -दि. २८ आज इंदापूर पोलिस ठाण्यात १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव येथे साजरा होत असलेला विजय दिनाचा कार्यक्रम व ३१ डिसेंबर च्या रात्री नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिस स्टेशनच्या वतीने सर्व पक्षिय व सर्व जातिय पदाधिकारी यांच्या सोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्वांनी शांतता राखण्याचे व सलोखा निर्माण करण्यासाठी सर्वानी काळजी घ्यावी तसेच शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये वातावरण बिघडणार नाही व गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे अवहान पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी उपस्थिततांना केले..
भिमा कोरेगाव येथे येणार्‍या लाखो भिमसैनिंकाच्या सोयीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती पवार साहेबांनी दिली. कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व महत्त्वाच्या सुचना व मार्गदर्शन केले आंबेडकरीकार्यकर्रत्यांनी व पक्षाच्या प्रतिनिधीनी प्रशासनाकडे विविध प्रकारच्या सुचना बैठकीच्या अनुशंगाने मांडल्या त्या सर्व सुचना मा पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण तसेच जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे पाठविण्यात येतिल व अमलात आणण्याचा प्रयत्न केले जाईल असे आश्वासन पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननावरे आरपीआय पुणे जिल्ह्या संघटक शिवाजीराव मखरे आरपीआय तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे सुधीर मखरे गफुर सय्यद आरबाज शेख धरमचंद लोढा प्रशांत सिताप चाँद पठाण बाळासाहेब सरवदे सिखंदर बागवान इतर प्रतिनिधी उपस्थित होत

Leave a Reply

Back to top button