Amalner

लम्पी आजाराचा गुरांवर  वाढता प्रादुर्भाव..!पातोंडा येथे या आजाराचा पहिला बळी..!

लम्पी आजाराचा गुरांवर वाढता प्रादुर्भाव..!पातोंडा येथे या आजाराचा पहिला बळी..!अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथे लम्पी या आजाराने एक बैल दगावल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी विठ्ठल झगा बडगुजर यांचा बैल गेल्या दहा दिवसापासून आजारी होता. सुरुवातीला या बैलाच्या अंगावर लहान मोठ्या गाठी झाल्या होत्या. बैलावर गावातील पशुधन दवाखान्यात उपचार करण्यात आले. त्यानंतर अमळनेर येथील पशुधन अधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्याकडून उपचार केले. परंतु बैल पूर्णतः अशक्त होऊन, चारा खात नव्हता. अखेर 18 रोजी बैल या आजाराने दगावला.
सदर बैल हा लम्पी आजाराने दगावल्याचे शेतकरी विठ्ठल बडगुजर यांनी सांगितले. बडगुजर यांच्याकडे एक लाख रुपये किंमतीची ठेलारी बैल जोडी आहे. पन्नास हजार रुपये किमतीचा एक बैल ऐन शेतीकामाच्या वेळी दगावल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जनावरांवर आलेल्या लम्पी या आजारामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर बैलाला त्यांनी स्वतःच्या शेतात पुरले आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभाग आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button