Mumbai

सोनू सूद च्या घरावर आयकर विभागाचा छापा…!

सोनू सूद च्या घरावर आयकर विभागाचा छापा…!

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई येथील घरावर आयकर विभागाची टीमने छापा टाकला आहे.

सोनू त्याच्या संपूर्ण कार्यामुळे चाहत्यांचा खूपच आवडता आहे. सोनू सूद आजकाल त्याच्या अभिनयापेक्षाही लोकांची सेवा करण्यासाठी अधिक ओळखला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये सोनू ‘मसीहा’ म्हणून पुढे आला होता.आणि तीच ओळख त्याची चाहत्यांच्या मनात आहे.सोनू स्व: मेहनतीने चित्रपट सृष्टी त नाव कमावले आहे.त्याने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि पंजाबी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. लॉकडाऊन दरम्यान गरजवंतांना आवश्यक ती सगळी मदत करणारा म्हणून सोनूची ओळख आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाची टीमने सोनूच्या घराचा सर्वे केला आहे. आयटी विभाग मुंबईत अभिनेता सोनू सूदच्या संपत्तीचे 6 भागात सर्वेक्षण सुरू आहे.

कोरोना महासाथीदरम्यान सोनू सूदने गरजूंना मोठी मदत केली आहे. माध्यमांसह सर्वसामान्यांनी सोनूच्या कामाचं मोठं कौतुक केलं आहे. कोरोना महासाथीदरम्यान घरी परतणाऱ्या मजुरांना सोनूने वाहनांची व्यवस्था करून दिली तर अनेकांना आर्थिक साहाय्य केलं होत.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घराचा आयकर विभागाकडून माहिती घेण्यात आली. आयकर विभागची टीम सकाळी सोनू सूदच्या घरी पोहचली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी विभागाने सोनू सूदशी संबंधित 6 ठिकाणांचे सर्वे केला. मात्र कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आले नाहीत. आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 133 ए नुसार सुरू असलेल्या सर्वे अभियानात आयकर अधिकारी पाहणी करत आहेत.गेल्या काही दिवसांपासून सोनू सूद निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

इतक्या संपत्तीचा आहे मालक..
सोनू सूदकडे साधारणपणे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमानसोबत ‘दबंग’ तर शाहरुखसोबत ‘हॅपी न्यू इयर’ ह्या चित्रपटात काम केले होते.सोनू आपली पत्नी सोनाली आणि मुलांसमवेत मुंबईत राहतो.

सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात राहतो.सोनू दोन फ्लॅट, जुहूमध्ये एक हॉटेल,कॉफी पॉईंट्स चा मालक आहे. आहेत.सोनूकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय 66 लाखांची कार आहे.तसेच ऑडी क्यू 7 ही 80 लाखांची कार पोर्शची 2 कोटी रु ची पनामा कार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button