Manchar

बाळ हिरडा खरेदी व पेसा क्षेत्रात आदिवासी गावाचा समावेश करा – ट्रायबल फोरम ची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदनाद्वारे मागणी

बाळ हिरडा खरेदी व पेसा क्षेत्रात आदिवासी गावाचा समावेश करा – ट्रायबल फोरम ची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदनाद्वारे मागणी

दिलीप आंबवणे मंचर

मंचर : आदिवासी भागातील बाळ हिरडा औषधी वनस्पती असलेले फळ आज पर्यंत आदिवासी महामंडळ खरेदी करत होते. मात्र चार वर्षे झाली खरेदी बंद आहे आदिवासी महामंडळाच्यावतीने झालेला आदिवासींवरील अन्याय दूर करावा व खरेदी चालू करावी अशी मागणी ट्रायबल फोरम च्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदन देऊन केली.
तसेच खेड व मावळ हे दोन तालुके पेसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी आपल्या माध्यमातून महा विकास आघाडी सरकारची शिफारस राज्यपालांना करावी अशी मागणी केली. मावळ तालुका व खेड तालुका हे दोन तालुक्यांमध्ये अनेक आदिवासी गावांमध्ये लोक संख्या मोठ्या प्रमाणात आदिवासी असून सुद्धा ही गावे भौगोलिक दृष्ट्या आदिवासी दाखवली गेली नाहीत त्याचा फटका आदिवासी बांधवांना आज बसत आहे. अनेक आदिवासी ग्रामपंचायती या भागात असून त्यांना पेसा क्षेत्राचा निधी उपलब्ध होत नाही पेसा क्षेत्र घोषित झाल्याशिवाय तेथे पेसा निधी उपलब्ध होणार नाही म्हणून लवकरात लवकर आपल्या माध्यमातून पेसा क्षेत्र या विषयाला न्याय द्यावा व पुणे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील आदिवासी जनतेला प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी केली ट्रायबल फोरम च्या वतीने आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
त्यावेळी ट्रायबल फोरमचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पुणे विभागीय उपाध्यक्ष मारुती खामकर, पुणे जिल्हा अध्यक्ष रोहित सुपे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल कोवे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button